gold sakal
नागपूर

Nagpur : विमानतळावर सव्वा किलो सोने पकडले; ७२ लाखांच्या सोन्यासह महिलेला अटक; नागपूर तस्करीचे नवे हब

प्रवाशांची बाहेर पडताना तपासणी करण्यात आली, त्याचदरम्यान एका महिला प्रवाशावर संशय आला.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी सोन्याची तस्करी करणाऱ्या एका महिलेला सीमा शुल्क विभागाच्या पथकाने अटक केली. ही महिला मुंबईची असून तिने विशिष्ट प्रकारे तयार केलेल्या पट्यात पेस्ट केलेले सोने लपवून आणले होते. तपास यंत्रणेला महिलेवर संशय आल्यानंतर तपासणी केली असता १ किलो २७० ग्रॅम सोने पकडले. त्याची किंमत ७२ लाख २९ हजार रुपये आहे.

नागपूर विमानतळ सोन्याच्या तस्करीसाठी आता हब होऊ लागले आहे अशी शंका येऊ लागली आहे. कारण गेल्या २० दिवसांत नागपूर विमानतळावर ३ कोटी ८५ लाखांच्या सोन्याची तस्करी पकडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एअर अरेबियाच्या फ्लाइटमध्ये सोन्याचा तस्कर आल्याची गुप्त माहिती डीआरआयला मिळाली.

एजन्सीने नागपूर विमानतळावर सापळा रचला. प्रवाशांची बाहेर पडताना तपासणी करण्यात आली, त्याचदरम्यान एका महिला प्रवाशावर संशय आला. डीआरआयने तिला तत्काळ ताब्यात घेऊन झडती घेतली. तेव्हा विशिष्ट प्रकारच्या काळ्या बेल्टमध्ये १ किलो २७० ग्रॅम सोने सापडले. सोने नाण्याच्या आणि पेस्टच्या स्वरूपात होते. महिला शारजाहून नागपुरात आला होती

शारजाहून प्रथमच नागपुरात आली असली तरी नागपूर विमानतळावर सोन्याच्या तस्करीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी सीमाशुल्क विभागाने पाच ते सहा सोन्याच्या तस्कराला सोन्यासह अटक केली होती. डीआरआयने आरोपीचा पासपोर्ट जप्त केला आहे. आरोपीची चौकशी सुरू आहे. सीमा शुल्काची चोरी करण्यासाठी नागपूर हे सोन्याच्या तस्करीसाठी आता केंद्र झालेले आहे.

सीमाशुल्क आयुक्त संजय कुमार यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त धैर्यशील कणसे आणि पीयूष भाटी यांच्या मार्गदर्शनाखाली सीमाशुल्क अधिकारी काम करत होते. नागपूर कस्टम्सच्या एअर कस्टम्स युनिट आणि एअर इंटेलिजन्स युनिटच्या अधिकाऱ्यांच्या चमूचे नेतृत्व त्यांचे सहाय्यक आयुक्त व्ही. सुरेश बाबू, व्ही.

लक्ष्मी नारायण यांच्या नेतृत्वात अधीक्षक अंजू खोब्रागडे, त्रिदीप पाल, प्रकाश कापसे व सुधाकर बारापात्रे, निरीक्षक आदित्य बैरवा यांचा समावेश होता. सीमाशुल्क कायदा १९६२ अन्वये नागपूर सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पुढील तपास सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मगरी, शार्क असलेल्या नदीत पडले Ian Botham; ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज क्रिकेटपटूने वाचवले अन्यथा...

Latest Maharashtra News Updates : अलिगढ मुस्लिम विद्यापीठाला अल्पसंख्याकांचा दर्जा - SC

Sawantwadi Election : शिवसेनेच्या उमेदवारीवर नारायण राणे शेवटचे लढले, अटीतटीची 'ती' निवडणूक ठरली लक्षवेधी

Beed Assembly Election 2024: बीड विधानसभेच्या बंडखोर अपक्षांनी पळविले तोंडचे पाणी!

Jayant Patil : 'महायुतीच्या त्रिकुटाने महाराष्ट्र गुजरातच्या दावणीला बांधला'; जयंत पाटलांची सडकून टीका

SCROLL FOR NEXT