nagpur 1st phase voting percentage of lok sabha poll gadkari claim more votes than other Sakal
नागपूर

Lok Sabha Poll 2024 : आकडेमोड सुरू, शक्यतांचा बाजार गरमागरम; लोकसभेतील सूज विधानसभेत उतरली ; मतदानाचा टक्का घसरला

मतदान आटोपताच आता आकड्यांचा आणि टक्क्यांचा खेळ नागपूरमध्ये सुरू झाला आहे. त्यावरून वेगवगेळे अंदाज वर्तविले जात आहे.

राजेश चरपे -सकाळ वृत्तसेवा

नागपूर : मतदान आटोपताच आता आकड्यांचा आणि टक्क्यांचा खेळ नागपूरमध्ये सुरू झाला आहे. त्यावरून वेगवगेळे अंदाज वर्तविले जात आहे. दावे-प्रतिदावे केले जात आहे. उमेदवारांच्या मताधिक्याबाबत शंकाही व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे २०१९च्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला मिळणाऱ्या मतांचा टक्का घसरला हे विशेष.

गडकरी यांनी मागील निवडणुकीत नाना पटोले यांना पराभूत केले होते. त्यावेळी सुमारे दोन लाख १६ हजारांचे मताधिक्य त्यांनी घेतले होते. यावेळी गडकरी यांनी पाच लाखांच्या मताधिक्याने निवडून येण्याचा दावा केला आहे.

मात्र मतदानाच्या टक्केवारीत अवघी दोन टक्केच वाढ झाली आहे. विकास ठाकरे यांच्यासाठी एकत्र आलेले काँग्रेसचे नेते, दलित व मुस्लिमांसोबतच हलबा समाजाची नाराजी आणि मोदी यांच्यावरच्या रोष बघता मताधिक्याबाबत आताच बोलणे अवघड असल्याचे बोलले जात आहे.

मागील लोकसभेच्या निवडणुकीत मोठा विजय मिळवल्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपचे दोन आमदार पराभूत झाले होते. गडकरी लढले त्यावेळी सर्व सहा विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार होते. त्यानंतर उत्तरमधून आमदार मिलिंद माने आणि पश्चिममधून सुधाकर देशमुख पराभूत झाले.

दक्षिणमधून मोहन मते आणि मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघात विकास कुंभारे थोडक्यात बचावले. गडकरी यांच्या विरोधात लढत असलेल्या विकास ठाकरे यांनी पश्चिमधून ४९ टक्के मते घेतली तर उत्तरमधून नितीन राऊत यांनी ५१.६ टक्के मते घेतली. उत्तरमधून गडकरी मागील निवडणुकीत मतांच्या टक्केवारीत मागे होते. आता पश्चिम नागपूरमधून कुणाला धोका होणार, अशी चर्चा होत आहे.

२०१९ च्या निवडणुकीत पश्चिममधून गडकरी यांना ५४.०२ टक्के मते मिळाली होती. याच निवडणुकीत मध्य नागपूरमधून गडकरी यांना ५५.५५ टक्के मिळाली होती. लगेच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यात सुमारे पाच टक्क्यांनी घट झाली.

आमदार कुंभारे यांना ५०.८ टक्के मिळाली होती. पूर्व नागपूरमधून ५७.२१ मते गडकरी यांना मिळाली होती. मात्र खोपडे यांना ५३.०६ टक्के मिळाली. लोकसभेत दक्षिण- पश्चिममधून ५३.८२ मते मिळाली होती. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना ४९.३४ टक्केच मते मिळाली. एकूणच लोकसभेनंतर भाजपच्या मतदानाच्या टक्केवारीत घट झाली होती. ही भाजपसाठी चिंतेची बाब ठरू शकते.

नागपूर लोकसभा २०२४

  • दक्षिण-पश्चिम ः ५३.०३

  • दक्षिण नागपूर ः ५२.८०

  • पूर्व नागपूर ः ५५.७६

  • मध्य नागपूर ः ५४.०२

  • पश्चिम नागपूर ः ५३.७१

  • उत्तर नागपूर ः ५५.१६

लोकसभा २०१९

  • द-पश्चिम ५३.८२

  • दक्षिण ५३.१२

  • पूर्व ५७.२१

  • मध्य ५५.५५

  • पश्चिम ५४.०२

  • उत्तर ५४.७४

विधानसभा २०१९

  • द-पश्चिम ः ४९.३४

  • दक्षिण ः ५०.०८

  • पूर्व ः ५३.०६

  • मध्य ः ५०.०८

  • पश्चिम ः४९.०३

  • उत्तर ः ५१.०६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT