Nagpur Sun Stroke Death: नागपूर शहरात उन्हाचा तडाखा वाढला. नागपूरचा पारा ४१.२ अंशावर पोचला. यामुळे उष्माघाताची शक्यता बळावली असून शहरात मागील चोवीस तासांत दोन जणांचा रस्त्यावर मृत्यू झाल्याची घटना घडली. हे मृत्यू उष्माघाताने झाल्याची प्राथमिक नोंद घेतली आहे. यातील एक मृत्यू बेलतरोडी तर दुसरा मृत्यू तहसील पोलिस ठाण्यांतर्गत नोंदविले आहेत. मात्र महापालिकेच्या डेथ ऑडिट समितीच्या अहवालानंतर या मृत्यूंच्या नेमक्या कारणांची नोंद होईल. तोपर्यंत हे उष्माघाताचे की इतर कारणांचे हे मात्र गुलदस्त्यात आहे.
बेलतरोडी हद्दीत १ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजून १२ मिनिटांच्या सुमारास वेळाहरी गावानजीक बर्डे यांच्या घराजवळ सुमारे ५० वय असलेला अनोळखी व्यक्ती बेशुद्धावस्थेत पडल्याचे आढळले. पोलिसांनी उपचारासाठी एम्स रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
याप्रकरणी फिर्यादी राजू काशिनाथ क्षीरसागर यांनी दिलेल्या सूचनेवरून बेलतरोडी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. तहसील हद्दीतील पाचपावली - १ फाटकाजवळ एक ५५ वर्षीय अनोळखी व्यक्ती देखील पडून होता. उपचारासाठी मेयोत नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.