baby sakal
नागपूर

Nagpur : आयव्हीएफद्वारे महिन्याला होतो ४०० मुलांचा जन्म!

उपराजधानीत २५ वर्षांपूर्वी होते एकच केंद्र, आता संख्या पोहोचली ३२ वर केवल जीवनतारे

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - आयव्हीएफ तंत्रज्ञानाने वंध्यत्वावर मात करणे शक्‍य झाले आहे. यामुळे संतानहिन जोडप्यांचा याकडे कल वाढला आहे. शहरात २५ वर्षांत आयव्हीएफ सेंटरची संख्या ३२ वर पोहोचली असून दरमहा ४०० वर मुलं याद्वारे जन्माला येत आहेत.

जो़डप्याला मूल होत नसेल तर त्यासाठी स्त्रीला दोषी ठरवले जाते. सासरच्यांकडूनही छळ होतो. मात्र यास महिलाच जबाबदार नसून पुरुषही जबाबदार आहेत. नव्वदच्या दशकात पंचविशीत कुटुंब पूर्ण होत होते. काळ बदलला, स्रीपुरुषांमध्ये करिअरविषयक महत्त्वाकांक्षा वाढली. जीवनशैली, आहारशैली बदलली आणि वंध्यत्वाचे प्रमाण वाढले.

आयव्हीएफमधून दरमहा होतो ४०० मुलांचा जन्म !

१९९० मध्ये उशिरा लग्न होण्याचे प्रमाण १० टक्के होते. आता ते ४० टक्क्यांवर पोहोचले आहे.

वंध्यत्वास महिला कारणीभूत,पीसीओडी,गर्भनलिकेतील दोष,अंतस्रावी ग्रंथीमधील बिघाड,एन्डोमेट्रॉसिस,फायब्रोइट (गाठी),वय ३२ पेक्षा जास्त असणे

वंध्यत्वास पुरुष कारणीभूत

शुक्राणू नसणे

शुक्राणू संख्या कमी असणे

टेस्टीज-अंडकोष अपूर्ण असणे

अंडकोष खाली उतरलेला नसणे

शस्त्रक्रियेतून अंडकोष काढून टाकणे

वय ५० वर्षोपेक्षा जास्त असणे

स्त्री-पुरुषांमधील समान कारणे

उशिरा लग्न होणे

काळानुसार बदललेली जीवनशैली

महिला पुरुषांमधील ताणतणाव

महिला व्यसनाचे प्रमाण वाढले

महिला पुरुषांचे उशिरा लग्न होणे

स्त्री-पुरुषांमधील स्थूलपणा

वंध्यत्वास कारणीभूत टक्केवारी

-पुरुष - ३५ टक्के

-स्त्री - ३५ टक्के

-एकत्रित - २० टक्के

-अस्पष्ट कारणे- १० टक्के

असे वाढले नागपुरातील केंद्र

-१९९७ : १ आयव्हीएफ केंद्र

-२०२३ : ३२ आयव्हीएफ केंद्र

आहारावर अनियंत्रण, चुकीच्या आहारामुळे महिलांमध्ये हार्मोन्समध्ये बदल होतो. थायरॉईड, पीसीओएससारख्या आजारांसोबत मासिक पाळीच्या चक्रात बदल होत असल्याने स्त्री बीज निर्मितीवर परिणाम होतो. दाम्पत्यांमध्ये अलीकडे संवाद कमी झाली. वादविवादाचे प्रसंग वाढले,यामुळे वंध्यत्वाचा धोका आहे.

डॉ. सुषमा देशमुख, स्त्री व प्रसूतीरोग तसेच आयव्हीएफ तज्ज्ञ

नैसर्गिकरित्या होणाऱ्या गर्भधारणेसाठी जुनी भारतीय जीवनशैली योग्य आहे. आठ तास झोप, पौष्टिक आहार, ताणतणावरहित जीवनशैली, योगा व प्राणायामातून मन प्रसन्न ठेवता येते. प्रसन्न, समाधानी मन असल्यास गर्भधारणेस निकोप वातावरण निर्माण होते.

  • -डॉ. नटचंद्र चिमोटे, आयव्हीएफ तज्ज्ञ, नागपूर

अशी असते आयव्हीएफ उपचारपद्धती

आयव्हीएफ उपचारपद्धतीत स्त्रीच्या शरीरातील बिजांडे आणि पुरुषांचे शुक्राणू या दोघांचे मिलन शरीराबाहेर प्रयोगशाळेत होते. स्त्रीला बिजांडनिर्मिती क्षमतेनुसार बिजांडे तयार होण्याचे इंजेक्शन दिले जाते. नंतर ती बिजांडे बाहेर काढली जातात. त्यांचा शुक्राणूशी संयोग घडवला जातो. हे भ्रूण प्रयोगशाळेत वाढवले जाते. यातील चांगल्या प्रतीचे भ्रूण स्त्रीच्या गर्भाशयात सोडण्यात येते. १५ दिवसांनी गर्भधारणा यशस्वी झाली आहे किंवा नाही हे रक्त चाचणीतून तपासले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT