Nagpur Agriculture crop loss 
नागपूर

Agriculture : संत्रा बागांवर काळ्या माशीचे संकट

कोळशी रोगाचा होणार प्रसार, संशोधकांचे मत, शेतकऱ्यांत चिंता

सुधीर बुटे

काटोल : काटोल, नरखेड, कळमेश्वर, सावनेर तालुक्यातील संत्रा व मोसंबी बागेत सध्यस्थितीत काळया माशीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून येत आहे. विदर्भातील हवामान या किडीच्या वाढीसाठी अनुकूल असून मुख्यत्वे तीन पिढया पूर्ण होतात. त्यामुळे बागांचा ऱ्हास होत असल्याची माहीती प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वंडली येथील कीटकनाशक तज्ज्ञ प्रा.प्रवीण दरणे यांनी दिली. माशीमुळे फळाच्या गुणवत्तेवर व उत्पादनावर विपरीत परिणाम होतो.

काटोल व नरखेड तालुक्यात मागील आठवडयात झालेल्या सर्व्हेक्षणात मोसंबी पिकावर सोनोली, मेंडकी, खुटांबा, गोंडीदिग्रस, भरतवाडा, झिलपा, कोलुभोरगड, मासोद, धुरखेडा, खैरी, शिरमी, सावरगांव, नरखेड, जलालखेडा, भिष्णूर, मोवाड, मेंढला, कळमेश्वर तालुक्यातील मोहगांव, सुसूंद्री, मांडवी, खुमारी, पारडी, कळमेश्वर, पिलकापार, सावली बुद्रुक, गुमथळा, सावनेर तालुका, कारंजा (वर्धा) वरुड मोर्शी (अमरावती) भागात मोसंबी व संत्रावर काळया माशीचा प्रादुर्भाव खूप जास्त प्रमाणात वाढलेला तज्ज्ञांना आढळळा. अंडयातून पिल्ले बाहेर पडून पानावर व फळांवर स्त्राव सोडल्यामुळे बुरशी आद्रतेमुळे वाढून पानातील व फळातील अन्नद्रव्य तयार करण्याची प्रक्रिया बाधीत झाली आहे. फळातील रस बेचव होऊन फळाला योग्य भाव मिळत नसल्याकारणाने शेतकरीवर्ग चिंतेत दिसून येत आहे.

अशी घ्यावी खबरदारी

  • परभक्षक मित्र किडीची ४-६ अंडी/फांदी हस्त बहाराचे वेळी दोन वेळा सोडावेत.

  • मृग बहरासाठी जुलैच्या शेवटच्या आठवड्यात व ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात तर हस्ता बहारासाठी डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात व पुन्हा पंधरा दिवसानंतर व आंबिया बहारासाठी मार्चच्या शेवटचा आठवड्यात व पुन्हा पंधरा दिवसानंतर निंबोळी तेल१०० ते १२५ मिली अधिक दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करावी.

  • निंबोळी तेल पाण्यात मिश्रन करण्यासाठी शंभर मिली निंबोळी तेलात दहा ग्रॅम डिटर्जंट किंवा दहा मिली टिपॉल या प्रमाणात मिसळावे.

  • मृग बहारावरील फवारणीत कॉपर ऑक्सीक्लोराईड ३० ग्रॅम अधिक दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन पाण्यात मिसळून फवारणी करावी.

  • माशीचे जीवनचक्र लक्षात घेऊन प्रौढ काळी माशीच्या कोषातून बाहेर निघण्याच्या अवस्थेत संत्रा बगीच्यात अधूनमधून पिवळ्या रंगाचे पत्र्याच्या पृष्ठभागावर एरंडीचे तेल अथवा ग्रीस लावलेले पिवळे चिकट सापळे बगीच्यात उभारावे.

अशी असते काळी माशी

काळी माशी आकाराने लहान साधारणतः एक ते दीड मिलिमीटर लांब असून पंख काळसर व पोटाचा भाग लाल असतो. विदर्भातल्या हवामानात या किडीच्या तीन पिढ्या पूर्ण होतात. या कीडीच्या माशा नवतीच्या कोवळ्या पानावर खालच्या बाजूने अंडी घालतात. कोवळ्या पानावर घातलेली अंडी सूक्ष्म असून सुरुवातीस पिवळसर रंगाची असतात. चार ते पाच दिवसानंतर या अंड्यांचा रंग करडा होतो. उन्हाळ्यात पंधरा ते वीस दिवसात तर हिवाळ्यात पंचवीस ते तीस दिवसात अंड्यातून माशीची पिल्ले बाहेर पडतात.पिल्ले पानावर फिरून फिरून योग्य जागेचा शोध घेतात व नंतर एकाच ठिकाणी राहून पानातील अन्नरस शोषण करतात.

अंडी उबवण्याच्या कालावधीत काही परभक्षी किडी आढळून आल्यास उदा. क्रायसोपा, लेडीबर्डबिटल इ. मित्र किडी आढळून आल्यास फवारणीमध्ये फेरबदल करावा. अशावेळी किटकनाशकाची मात्रा अर्धी करून निंबोळी तेल १०० मि.ली. किंवा ५ टक्के निंबोळी द्रावणात फवारणी करून फळामुळे होणारे संभाव्य नुकसान टाळता येईल.

-डॉ.प्रदीप एन.दवणे कीटकशास्त्रज्ञ, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, काटोल( डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यालय, अकोला)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vadgaon Sheri Assembly Election 2024 Result Live: वडगाव शेरी मतदारसंघात तुतारी वाजली; बापू पठारेंचा 5000 मतांनी विजयी

Devendra Fadnavis : फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, एक है तो 'सेफ' है!

Karad South Assembly Election 2024 Results : कऱ्हाड दक्षिणेत काँग्रेसच्या सत्तेला सुरुंग! पृथ्वीराज चव्हाणांचा पराभव करत अतुल भोसलेंचा मोठा विजय

Madha Assembly Election 2024 Result Live: माढ्यात तुतारीची गर्जना, अभिजित पाटील यांचा दणदणीत विजय

Parag Shah Won in Ghatkopar East Assembly Election: घाटकोपर पूर्व मतदार संघावर भाजपचा झेंडा कायम; पराग शाहांचा मोठ्या फरकाने विजय

SCROLL FOR NEXT