Kharif Sowing  sakal
नागपूर

Nagpur Kharif Sowing : नागपूर जिल्ह्यात केवळ एक टक्का क्षेत्रावरच पेरणी

शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत; १५ हजाराहून अधिक क्षेत्राचे नियोजन

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : जिल्ह्यात कृषी विभागाने यंदा खरीप हंगामासाठी ४ लाख ७९ हजार ८१० हेक्टरवरील क्षेत्रात पेरणीचे नियोजन केले आहे. पण निम्मा जून लोटूनही अद्याप पेरणी योग्य पाऊस झालेला नाही. शेतकऱ्यांना पेरणीकरिता दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

काही शेतकऱ्यांकडून पेरणीला सुरवात करण्यात आली असून नियोजित क्षेत्राच्या ०.८६ टक्के इतकी आहे.

खरीप हंगाम हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो. या हंगामामध्ये ओलिताची सोय नसलेल्यांसह सर्वच शेतकरी हे मान्सूनच्या पावसाच्या भरवशावर पीक घेत असतात.

अशातच या हंगामासाठी कृषी विभागाने गतवर्षीच्या तुलनेत सुमारे १५ हजारांहून अधिक क्षेत्राचे नियोजन केले आहे. यंदा खरिपासाठी विभागाने ४. लाख ७९ हजार ८१० हेक्टरवरचे नियोजन केले आहे. पावसाने राज्यातील काही भागात हजेरी लावली आहे.

परंतु नागपूर जिल्ह्यात अद्यापही पेरणी योग्य पाऊस झालेला नाही. सरासरी जूनमध्ये जिल्ह्यात शंभर मिमी वरच पाऊस होत असतो. परंतु यंदा तोही आकडा गाठला नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकरीही पेरणीसाठी पावसाची प्रतीक्षा करत आहेत.

अशात काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणीही उरकवून टाकल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे पाऊस लांबल्यास त्यांना दुबार पेरणीचे संकट ओढाविण्याची शक्यता नाकारता येत नाही. आजवर जिल्ह्यात प्रमुख पीक असलेल्या कापसाची नियोजित क्षेत्राच्या ३ हजार ३९६ हेक्टर, भाताची ५.९ हेक्टर, तुरीची ३० हेक्टर व सोयाबीनची ५७७ हेक्टर अशी एकूण नियोजित क्षेत्राच्या ०.८६ टक्के पेरणी झाली आहे.

पीक - नियोजित क्षेत्र

  • भात - ९५०००

  • मका - ४०००

  • कापूस - २२५०००

  • सोयाबीन - ९००००

  • तूर - ६१०००

  • ज्वारी - १०००

  • मुग - ३००

  • उडीद - ३००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS : पर्थ कसोटी जिंकताच गौतम गंभीर तातडीने मायदेशात परतला, नेमकं असं काय घडलंय?

Latest Maharashtra News Updates : एकनाथ शिंदे 11 वाजता मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार

Instagram New Feature : इंस्टाग्राममध्ये 3 धमाकेदार फीचर्सची एंट्री! पटकन बघून घ्या नवं अपडेट

Shashi Ruia Passes Away: एस्सार समूहाचे सह-संस्थापक शशी रुईया यांचे निधन

म्हणून अर्जुन आणि मलायकाचा झाला ब्रेकअप ; 'हे' होतं कारण

SCROLL FOR NEXT