नागपूर

Soybean Price Drop: सोयाबीनचे दर घसरले! शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट, दुहेरी संकट

सोयाबीनचे भाव हमीभावापेक्षा तब्बल सहाशे ते आठशे रुपयांनी कमी झाल्यामुळे तसेच सध्या भाव वाढीची आशा धूसर झाल्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Soybean Price Dropped: सोयाबीनचे भाव हमीभावापेक्षा तब्बल सहाशे ते आठशे रुपयांनी कमी झाल्यामुळे तसेच सध्या भाव वाढीची आशा धूसर झाल्यामुळे सोयाबीनला अपेक्षित दर मिळत नसल्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला असून शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे.

मागील तीन दशकांपासून सोयाबीन हे शेतकऱ्यांचे मुख्य पीक झाले आहे. या पिकावरच शेतकऱ्यांची खरी भिस्त असते. यावर्षी पावसाळा तब्बल एक महिन्याने उशिरा सुरू झाला. त्यानंतर पाऊस अनियमित पडल्यामुळे खरिपाच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट आली. एकरी दोन ते चार क्विंटलपर्यंत सोयाबीनचे उत्पन्न झाले. सोयाबीनच्या उत्पादनात खर्चही निघाला नाही बऱ्याच शेतकऱ्यांना सोयाबीनचे पिकामुळे मनस्ताप झाला आहे.

सोयाबीनचे भाव वाढत नसल्यामुळे आता सोयाबीन किती दिवस घरात ठेवायचे? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. आज ६ जानेवारी रोजी येथील बाजार समितीमध्ये सोयाबीनला ४००० ते ४४७० भाव मिळाला आहे. शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या वल्गना करणाऱ्या शासनाने बाहेर देशातून आयात होणाऱ्या तेलावरील ३० टक्के असलेली इम्पोर्ट ड्युटी घेणे बंद केले त्याचा परिणाम इतर देशातील पाम तेल आपल्या देशात आले व सोयाबीनचे भाव पडले. (Latest Marathi News)

उलट आपल्या येथील तेल कारखानदारांच्या डिओसीला प्रोत्साहन देण्याऐवजी बाहेर देशातून तेल आयात केले. याचा परिणाम सोयाबीनच्या भावावर झाला. कृषी मूल्य आयोगानेही आपल्या देशातील सोयाबीन उत्पादक प्रमुख राज्यांचा अहवाल उशिराने पाठविला. त्यामुळे जाणकारांकडून सोयाबीनचे भाव आणखी कमी होण्याची भीती वर्तविली जात आहे. परिणामी भाव कमी असले तरी बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक वाढली आहे.

यावर्षी नवीन सोयाबीन बाजारात येताच ५२५० रुपये एवढा भाव मिळाला होता. त्यानंतर सोयाबीनच्या भावात सातत्याने घसरण होत आहे. भाव वाढण्याची आशा आता धुसर झाली आहे. मागील वर्षी सोयाबीनला सरासरी सहा हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला होता. त्यामुळे याही वर्षी त्यापेक्षा जास्त भाव मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. या आठवड्यात सोयाबीनच्या दराने निचांकी पातळी ओलांडली आहे. (Latest Marathi News)

आज येथील बाजार समितीमध्ये ४००० ते ४४७० एवढा भाव मिळाला आहे. भाव वाढीची आशा धुसर झाल्यामुळे शेतकऱ्यांना मातीमोल दराने मालाची विक्री करावी लागत आहे. अनेक शेतकऱ्यांनी मागच्या वर्षीचे सोयाबीन गोदामामध्ये ठेवून तारण कर्ज घेतले आहे. कारण घेतलेल्या कर्जाचे व्याज व गोदाम भाडे, तसेच ऑक्टोंबर नोव्हेंबरच्या तुलनेत भाव कमी झाल्यामुळे हे शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. परिणामी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे.

केवळ वल्गना
शासनाने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या केवळ वल्गना केल्या. शेतकऱ्यांचा माल घरात येण्यापूर्वीच इतर देशातून शेतमाल व पाम तेल आयात करून स्थानिक बाजारपेठेत शेतमालाचे भाव पाडले जातात. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट तर सोडाच परंतु कर्ज मात्र चौपट होत आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT