Eye Infection - नागपूरकरांनो लक्ष द्या. शहरात डोळे येण्याची साथ आली आहे. डोळ्यातून पाणी येणे, डोळे लाल होणे ही या आजाराची प्राथमिक लक्षणे आहेत. सामान्यपणे प्रथम एकाच डोळ्याला हा संसर्ग होतो. नंतर दुसऱ्या डोळ्याला होतो. यासाठी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आधीच वातावरणातील बदलांमुळे हैराण असलेले नागपूरकर, डोळ्याच्या साथीने त्रस्त आहेत. रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याने रुग्णांनी बाहेर जाणे टाळावे. असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. शहरातील दहा टक्के लोकांना याची लागण झाली आहे.
रुग्णाकडे पाहिल्याने पसरत नाही आजार
पीडित व्यक्तीने इतरांकडे पाहिल्याने हा आजार पसरतो, असा गैरसमज आहे. मात्र, असे नसून हा आजार मुख्यतः शाळा, कार्यालयामार्फत घरात प्रवेश करत आहे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
बॅक्टेरिया किंवा वायरस सारख्या सुक्ष्म जीवाणूंची वाढ झाल्याने हा आजार होते. शहरात याच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. आय फ्लू (नेत्रश्लेष्मला) हा आजार डोळ्यांच्या संसर्गामुळे पांढऱ्या भागावर असलेल्या पातळ ऊतींची आणि पापणीच्या आतल्या बाजूस दाह संसर्गामुळे होतो, असे आरोग्य तज्ज्ञांनी सांगितले.
काय करावे
डोळे थंड पाण्याने धुवावे
ंंमोक्सीप्लोक्सासिन आयड्रॉपचा वापर करावा
स्वच्छ व सुती कापडाने डोळे पुसावे
डोळ्यांची सौंदर्य प्रसाधने किंवा दुसऱ्याच्या वस्तू:वापरू नये
लक्षणे गंभीर असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा
डोळे बोटाने चोळू नये. आवश्यक असल्यास टिशूच वापर करावा.
डोळ्यात धुळीपासून जपावे
प्रतिबंधात्मक उपाय
रुग्णाने काळा चष्मा वापरावा
स्वच्छ पाण्याने डोळे धुवावे
बाधितापासून अंतर ठेवावे
डोळ्यांना स्पर्श केल्यावर हात साबणाने धुवावे
कपडे वेगळे धुण्याची काळजी घ्यावी
रुग्णाने दररोज उशीची खोळ बदलावी
लक्षणे ....
• डोळ्याचा पांढरा भाग किंवा पापणीच्या आतील भाग लाल होणे • डोळ्यामधून पांढऱ्या रंगाचा स्राव बाहेर येणे • डोळ्यांना सतत पाणी येणे • डोळ्यांची आग होणे आणि खाज सुटणे
शहरातील ५ ते १० टक्के जनतेला आतापर्यंत हा आजार झाला आहे. आजाराचे कालावधी ४ ते ६ दिवस असून शाळा कार्यालयातून हा आजार पसरत आहे. लक्षणे दिसल्यास वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधावा.
डॉ. निलेश गादेवार असिस्टंट प्रोफेसर जीएमसी नागपूर
खबरदारी घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
जिल्ह्यात डोळे येण्याच्या (कंजक्टिव्हायटिस) पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर यांनी केले आहे. हा आजार पाच ते सात दिवसांमध्ये आटोक्यात येऊ शकतो.
संसर्ग झालेल्या व्यक्तीस वेगळे ठेवावे. संसर्ग झालेल्या विद्यार्थ्यांनी शाळेत जाऊ नये आजारी कर्मचाऱ्यांनी सुटी घेऊन आयसोलेशन पाळावे. डॅाक्टरांच्या सल्ल्यानेच औषधोपचार करावा. स्वतः किंवा इतर अप्रशिक्षित व्यक्तींकडून उपचार करू नयेत व घरगुती उपाय व औषधी घेऊ नयेत. असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.