bank fraud esakal
नागपूर

Nagpur : बनावट कागदपत्रांद्वारे बॅंकेला ८७ लाखांचा चुना

बॅंक अधिकाऱ्यांशी संगनमत चुकीचे व्हेरिफिकेशन करून केली फसवणूक

सकाळ वत्तसेवा

नागपूर : खोट्या वेरिफिकेशनच्या माध्यमातून बॅंकांना चुना लावणाऱ्या गुलाम अशरफी आणि त्यांच्या साथीदाराविरुद्ध लकडगंज पोलिसांनी पुन्हा एका प्रकरणात गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणात त्याने व साथीदारांनी बॅंक ऑफ महाराष्ट्रला चक्क ८७ लाख ७५ हजारांचा गंडा घातला. अशी माहिती समोर आली आहे. यापूर्वीही त्याने बॅंकांची अशाच प्रकारे चुकीचे वेरिफिकेशन करीत तीन कोटींनी फसवणूक केली आहे.

शेख इंद्रिस शेख युनुस (वय ३६), फिरोजा इंद्रिस शेख (वय ३२ रा. यशोदीप कॉलनी, महेंद्र नगर), हुकुमचंद उर्फ आदेश परसराम भलावी (वय ४०, रा. अलंकारनगर, बेसा रोड), गुलाम प्यारे साहेब अशरफी (वय ३७, रा. संपदा अपार्टमेंट, जयभिम चौक, यादवनगर) अशी आरोपींची नावे आहेत. त्यात बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या थर्ड पार्टी व्हेरिफिकेशन टीमचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ ऑगस्ट शेख इंद्रिस याने बॅंकेत दोन फ्लॅटची खरेदी करण्याकरिता कर्जासाठी अर्ज केला. अर्जाच्या कागदपत्रांच्या आधारे बॅंकेद्वारे कर्ज मागणाऱ्या ग्राहकाचे व्हेरिफिकेशन करण्यात आले. व्हेरीफिकेश करताना त्यात चुकीची माहिती देण्यात आली. त्यामुळे इंद्रिस याला ८७ लाख ७५ हजारांचे कर्ज मंजूर झाले.

मात्र, देण्यात आलेला पत्ता आणि कागदपत्रे बनावट असल्याची बाब निदर्शनास आल्याने बॅंकेद्वारे लकडगंज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यातून पोलिसांनी तपास करीत, प्रत्यक्ष चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय व्हेरिफिकेशन करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा शोध सुरू आहे.

यापूर्वी अशीच फसवणूक

गुलाम अशरफी आणि त्यांच्या साथीदारांवर यापूर्वीही पोलिस उपायुक्त गजानन राजमाने यांच्या नेतृत्‍वात अशाचप्रकारे कारवाई करण्यात आली होती. यानंतर तहसील, पाचपावली, कोतवाली आणि लकडगंज पोलिस ठाण्यांतर्गत गुन्हेही दाखल केले होते. आता पुन्हा एकदा लकडगंज पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra CM : महाराष्ट्रात बिहार पॅटर्न का लागू होऊ शकत नाही? ही आहेत ५ मोठी कारणे

Trending : 'असाच' मुलगा हवा! तरूणीने लग्नासाठी दिली जाहीरात; अजब अटीने उडाली सोशल मिडियावर खळबळ

Swanand Kirkire: कविता किंवा चाल सुचण्याची प्रक्रिया कशी असते? स्वानंद किरकिरेंची स्वास्थ्यमसाठी खास मुलाखत

Mumbai Indians Playing XI: मुंबई इंडियन्सने २३ जणांसाठी १०० कोटी खर्च केले, पण Rohit Sharma चा ओपनिंग पार्टनर कोण?

Share Market Closing: शेअर बाजार घसरणीसह बंद; अदानी समूहाच्या शेअर्स कोसळले

SCROLL FOR NEXT