नागपूर : माओवाद्यांशी संबंध असल्याच्या कारणावरुन जन्मठेपेची शिक्षा झालेल्या प्रा. साईबाबा यांच्यासह पाच आरोपींची नुकतीच मुंबई हायकोर्टानं निर्दोष मुक्तता केली. या निकालाला खंडपीठानं स्थगिती द्यावी, असं अपिल राज्य शासनानं केलं होतं. पण हे अपिल देखील हायकोर्टानं फेटाळून लावलं आहे. (Nagpur Bench of Bombay High Court rejects State appeal for stay on acquittal of GN Saibaba)
प्रा. साईबाबा यांच्यासह हेम मिश्रा, महेश तिर्की, विजय तिर्की, नारायण सांगलीकर, प्रशांत राही आणि दिवंगत पंडू नरोटे या सर्वांची निर्दोष मुक्तता केली आहे. या सर्वांना माओवाद्यांशी संबंध असल्याच्या कारणावरुन जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. (Latest Marathi News)
न्यायमूर्ती विनय जोशी आणि वाल्मिकी एसए मिनेझिस यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला, ज्यांनी साईबाबांच्या अपीलवर सुनावणी केली. सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाचा पूर्वीचा दोषमुक्तीचा आदेश रद्द केला होता.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.