Nagpur  Esakal
नागपूर

Nagpur Betting: चौकाचौकात ‘तो’ खेळत होता सट्टा, इमामवाडा पोलिसांकडून अटक; लॅपटॉप जप्‍त

सकाळ डिजिटल टीम

Cricket Betting Crime: एखाद्या परिसरात खोलीमध्ये थांबून आयपीएलच्या सामन्यावर खायवाडी आणि लगवाडी करीत सट्टा खेळल्यास अटक होण्याची भिती असल्याने ४१ वर्षीय इसमाने शक्कल लढवीत, चक्क चौकाचौकात काही मिनिटे थांबून मोबाईलवर खायवाडी आणि लगवाडी करीत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याप्रकरणी इमामवाडा पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

प्रशिल उर्फ गुड्डू गौतम पाटील (रा. चंदननगर) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयपीएलमध्ये गुरुवारी किंग्ज इलेव्हन पंजाब आणि गुजरात टायटन्स यांच्यात टी-२० सामना होता. या सामन्यावर खायवाडी आणि लगवाडी करण्यासाठी प्रशिलने चक्क दुचाकीवर मोबाईल, लॅपटॉप आणि प्रिंटर घेऊन मेडिकल चौक ते आसपासच्या चौकाच पंधरा मिनिट ते अर्धा तास थांबून येणाऱ्या ग्राहकांकडून सट्ट्याचे व्यवहार करीत होता.

ही बाब गस्तीवर असलेल्या इमामवाडा पोलिसांच्या निदर्शनास येताच, त्यांनी त्याला थांबवून तपासणी केली. यावेळी त्याच्याकडून सट्ट्यामध्ये वापरलेले दोन मोबाईल, प्रिंटर, लॅपटॉप, रोख ५ हजार आणि मोपेड असा ८० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

पोलिसांनी वेळोवेळी केलेल्या सट्ट्यावरील कारवाईत अनेकदा आरोपींचे लोकेशन ट्रेस होत असते. त्यामुळे सट्टा अड्ड्याचाही खुलासा होताना दिसतो. मात्र, ही खबरदारी घेण्यासाठी सतत लोकेशनमध्ये बदल केल्यास ती बाब लपविणे शक्य होते. त्यामुळे प्रशिलने ही शक्कल वापरल्याचे तपासात समोर आले. त्याच्यावर जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करीत अटक करण्यात आली. पोलिस प्रकरणाचा तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ratan Tata : भावुक क्षण! रतन टाटांच्या लाडक्या 'गोवा' ने घेतले अंत्यदर्शन; काय आहे हृदयस्पर्शी कहाणी?

Ratan Tata: इस्रायलपासून ते अमेरिकेपर्यंत... टाटा समूहाचे साम्राज्य विदेशात किती पसरले आहे?

Latest Maharashtra News Updates : रतन टाटांच्या पार्थिवाला पोलिसांकडून मानवंदना

Mokhada News : अर्ध्या तासाच्या वादळी पावसाने मोखाड्यात ऊडवली दाणादाण; सुदैवाने जिवीतहानी टळली..

शिल्पा शेट्टी- राज कुंद्रा यांना जुहूमधील घर खाली करण्याची नोटीस; पुण्यातील फार्म हाऊसदेखील केलं सील

SCROLL FOR NEXT