Nagpur Egg Hatching Centre Infected with Bird Flu: वणी केंद्रातील कोंबड्यांचा मृत्यू एव्हियन इन्फ्ल्युएन्झा (बर्ड फ्लू) मुळे झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी बर्ड फ्लू नियंत्रण कृती आराखड्यानुसार अंडी उबवणी केंद्रापासून एक किलोमीटरचा परिसर बाधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. तसेच दहा किलोमीटरपर्यंतचा परिसर हे निगराणी क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. केंद्रातील ८ हजार ५०१ पक्षी आणि १६ हजार ७७४ अंडी, ५ हजार ४०० किलो पक्षी खाद्य नष्ट करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी डॅा. इटनकर यांनी कुक्कुट शेड निर्जंतुकीकरण करण्यास सर्वोच्च प्राधान्य देऊन योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश पशुसंवर्धन विभागाला दिले. तसेच बाधित क्षेत्रातील कुक्कुट पक्षी खाद्य खरेदी, वाहतूक, बाजार, जत्रा, प्रदर्शन आयोजित करण्यास पुढील २१ दिवसांपर्यंत प्रतिबंधही लागू केले. संसर्ग केंद्रापासून दहा किलोमीटर त्रिज्येतील निगराणी क्षेत्रात अबाधित क्षेत्रामधून कुक्कुट पक्षी, अंडी व कुक्कुट खाद्य यांच्या वाहतुकीस मज्जाव राहणार नाही, असे जिल्हाधिकारी यांनी आदेशात स्पष्ट केले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार व केंद्र शासनाच्या अधिनियमानुसार जिल्हात शीघ्र कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. ४ मार्च रोजी रात्री नऊ पासून अंडी उबवणी केंद्रातील उर्वरित पक्षी नष्ट करण्याची कारवाई सुरू करण्यात आली. (Latest marathi News)
मरतुक अधिक असल्याने तपासणी
नागपूर प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रात काही दिवसांपासून कोंबड्यांमध्ये तुरळक मरतुकीचे(मरण्याचे) प्रमाण आढळून आले. २ मार्चला मरतुक अधिक प्रमाणात आढळल्यामुळे मृत पक्षी अन्वेषणासाठी पुणे येथे पाठविले. जे मरतुक झाले त्याचे नमुने राष्ट्रीय उच्च सुरक्षा प्राणी रोग संस्था भोपाळ (एनआयएछएसएडी) येथे पाठविण्यात आले होते. तपासणीअंती बर्ड फ्ल्यू झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे केंद्रातील ८ हजार ५०१ पक्षी आणि १६ हजार ७७४ अंडी, ५ हजार ४०० किलो पक्षी खाद्य नष्ट केले आहे.
संपूर्ण परिसराचे निर्जंतुकीकरण
प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रतील संपूर्ण परिसराचे निर्जंतुकीकरण पूर्ण करण्यात आले. रोगाच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने जिल्हातील सर्व पशुवैद्यकीय अधिकारी यांनाही सूचना देण्यात आलेल्या आहेत. जिल्ह्यात कुठेही असामान्य मरतुक आढळून आलेली नाही. शेतकरी व पशुपालक यांनी घाबरून न जाता जागरूक राहणे गरजेचे आहे, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांनी केले आहे. (Latest marathi News)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.