BJP news esakal
नागपूर

Nagpur : भाजप खेळणार महिला ओबीसी कार्ड

शिक्षक आमदार निवडणूक : नागोराव गाणारांना दिला नकार

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : भाजपने शिक्षक आमदार निवडणुकीसाठी उमेदवाराचे नाव गोपनीय ठेवले असले तरी यावेळी ओबीसी महिलेला संधी दिली जाणार असल्याचे जवळपास निश्चित केले आहे. त्यामुळे भाजप समर्थित इच्छुक उमेदवार इच्छुक महिला कोण याचा कयास लावत आहेत.

भाजप समर्थित महाराष्ट्र शिक्षक परिषदेचे आमदार नागोराव गाणार यांचा दुसरा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. निवडणूक आयोगाने मतदार नोंदणीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार जानेवारी ते डिसेंबर महिन्यात ही निवडणूक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सर्वच इच्छुकांनी यासाठी तयारी सुरू केली आहे.

७ नोव्हेंबरपर्यंत मतदारांची नोंदणी करायची आहे. काही संघटनांनी आपले उमेदवार जाहीर केले आहे. यात फुले शाहू आंबेडकर अध्यापक परिषदेने साहित्यिक प्रा. दीपककुमार खोब्रागडे, ओबीसी, फुले शाहू आंबेडकरी संघटनेच्यावतीने सुषमा भड, विदर्भ मुख्याध्यापक संघाने सतीश जगताप यांची नावे जाहीर केली आहे. काँग्रेस समर्थनासाठी राजेंद्र झाडे दबाव गट तयार करीत आहेत.

भाजपने मराठवाड्यात आपल्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे. सोबतच पक्षाच्या चिन्हावर शिक्षक आमदार मतदारसंघाची निवडणूक लढणार असल्याचेही जाहीर केले आहे. मात्र नागपूर विभागाचा निर्णय राखून ठेवला आहे.

आमदार नागोराव गाणार पुन्हा लढण्यास इच्छुक आहेत. महाराष्ट्र शिक्षक परिषदेने त्यांच्याच नावाचा प्रस्ताव पाठवला आहे. मात्र तो त्यांनीच पाठविल्याचा दावा त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांचा आहे. भाजपच्या नेत्यांनी त्यांना उमेदवारी देणार नसल्याचे स्पष्टपणे कळविले असल्याचे माहिती सूत्रांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT