Nagpur Flyover  Esakal
नागपूर

Nagpur: जपून जा रे भाऊ, पुढे आहे धोका! डोंगरगाव रेल्वेपुलाचा वळणमार्ग धोकादायक; पुलाचे 'गणित'च चुकले

सकाळ डिजिटल टीम

Nagpur Dongargaon Flyover: बुटीबोरी,हिंगणा या दोन्ही औद्योगिक परिसरासह वर्धा तसेच नागपूरकडे जाणाऱ्या नागरिकांना रहदारीसाठी डोंगरगाव ते हिंगणा मार्गावरील रेल्वे क्रॉसिंगवरील उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण होऊन वाहतूक सुरू झाली. परंतु या पुलाच्या बांधकामाचे ''गणित''च चुकल्याने या पुलावरून प्रवास करताना वाहनचालकांसाठी पूल मात्र समस्यांनी ''फुल्ल'' असल्याचे जागोजागी जाणवत आहे. पुलावरून प्रवास करताना ''जपून जा रे भाऊ,पुढे आहे धोका'' असेच गुणगुणत वाहनचालक जात असतो.

सुमारे दोन ते अडीच वर्षाआधी येथील रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू झाल्यामुळे येथून वाहतूक करणाऱ्या वाहनधारक आणि नागरिकांमध्ये कमालीची आशा निर्माण झाली होती.त्यातच सहा महिन्याआधी पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर पुलावरील वाहतूक सुरू झाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते.

मात्र सध्या पूल वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.या पुलावरून प्रवास करीत असताना डोंगरगावकडे वळण घेताना दुभाजक नसल्याने दोन्ही बाजूंनी येणारे वाहन एकमेकांना भिडून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पुलावरून ये-जा करताना डोंगरगावकडे वळण घेताना तर जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागत आहे. यू-टर्न, रिव्हर्स,जडवाहतूक आणि वाहनांची वर्दळ यामुळे उड्डाणपुलाचा डोंगरगावचा प्रवेशमार्ग दिवसेंदिवस धोकादायक ठरत आहे.(Latest Marathi News)

रेल्वे पुलाचे ''गणित''च चुकले

महिनोमहिने बनत असलेल्या या रेल्वे पुलाचे आयुष्य किमान पन्नास वर्षे राहील, असा दावा करण्यात येत असताना ''गणित'' चुकलेल्या पुलावर अवघ्या काही महिन्यांतच खड्डे पडल्याने पुलाच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.त्यामुळे हा पूल किती काळ टिकेल, असा सवाल उपस्थित केला जात आहे. आधीच रस्ते आणि पूल बांधकामामुळे नागरिकांना जिवावर उदार होऊन वाहने चालवावी लागत आहेत. त्यातच रस्त्यांची आणि पुलाची कामे अशा पद्धतीने होत असतील तर कोट्यवधी रुपये खर्च करून फायदा काय, असा सवाल आता सर्वच स्तरातून करण्यात येत आहे.

पुलाच्या बांधकामावर ''प्रश्नचिन्ह''

पूल वाहतुकीसाठी खुला होताच काही महिन्यांतच या पुलावर भला मोठा खड्डा पडला होता.यामुळे कोट्यवधी खर्च करून या रेल्वे पुलाच्या बांधकामाच्या दर्जाबाबत प्रश्न ​उपस्थित करण्यात येत होता. पुलाच्या बांधकामाचे पितळ उघडे होताच लगेच खड्डा बुजवून थातूरमातूर पुलाची दुरुस्ती करण्यात आली. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Katol Assembly Election 2024: काटोल विधानसभा मतदारसंघ देशमुखांचाच?, पण कोणत्या?

AUS vs IND Test: बुमराला शांत ठेवा अन्‌ भारताविरुद्ध मालिका जिंका! कॅप्टन कमिन्सचा ऑस्ट्रेलिया टीमला सल्ला

Devendra Fadnavis: विधानसभा जाहीर होताच फडणवीसांनी दिले शरद पवारांना चॅलेंज; उपमुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?

Gold Return: सोन्याची चमक वाढली; गेल्या एका वर्षात दिला 'गोल्डन रिटर्न', पहा 14 वर्षांचा इतिहास

Cleaning Tips: कमी वेळेत अन् जास्त मेहनत न घेता स्लायडिंग विंडो होतील स्वच्छ, फक्त वापरा 'या' सोप्या ट्रिक्स

SCROLL FOR NEXT