नागपूर : वाहतूक पोलिस अनेकदा सिग्नलवर उभे न राहता, झाडाच्या मागे उभे राहून नियम मोडणाऱ्यांना सोडण्यासाठी पैसे मागतात. मात्र, आता पोलिसांनी वसुलीसाठी नवाच फंडा अवलंबला असून स्वतःचा क्युआर कोड देत, चालानचे पैसे पोलिस विभागाच्या खात्यात जाण्याऐवजी थेट स्वतःच्या खात्यात टाकत आहेत अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
शहरात दररोज चौकात विनाहेल्मेट वाहन चालविणे, सिग्नल तोडणे आणि विविध कारणांवरून शेकडो वाहनांवर कारवाई केली जाते. यामध्ये शहरातील प्रत्येक चौकात किमान २० ते २५ चालान कारवाई होतात. वाहतूक पोलिसांना कारवाईसाठी एक डिव्हाईस देण्यात येते. त्याद्वारे सुरुवातीला गाडीचा क्रमांकाचा फोटो घेताच, त्या वाहनावर किती चालान पेंडिंग आहेत याची माहिती मिळते.
त्यानंतर चालान भरण्यासाठी डिव्हाईसवर एक ‘लिंक’ येते. त्या लिंकच्या माध्यमातून आलेला क्युआर कोड स्कॅन होताच, नागरिकांना चालान भरल्याचा संदेश मोबाईलवर येतो. मात्र, काही पोलिस हे चालान भरताना, स्वतःच्या खात्याचा क्युआर कोड देत, ते पैसे आपल्या खात्यात वळवित असल्याची बाब निदर्शनास आली आहे.
अनेकांना असे पैसे घेतल्याची पावतीच मिळालेली नाही. त्यामुळे वाहतूक पोलिसांच्या कार्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होताना दिसत आहे. दरम्यान या प्रकरणी वाहतूक पोलिस उपायुक्त चेतना तिडके यांना संपर्क केला असता, त्यांनी माहिती मागवून तपास करण्यात येईल, असे स्पष्ट केले.
असा घडला प्रकार
शहरातील वर्दळीच्या ठिकाणी एका जणावर चालानची कारवाई करण्यात आली. या कारवाईत, त्याच्याकडून एका वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याने ७६० रुपयांचे चालान वसूल केले. ते भरण्यासाठी त्याने स्वतःचा क्युआर कोड दिला. याशिवाय त्याची पावती तुम्हाला येईल असे सांगितले. मात्र, महिना झाला तरी, त्याची पावती मिळाली नाही. याबाबत वाहतूक विभागाकडे कळविले. मात्र, त्यांनी चालान व्ययक्तिकरित्या घेता येत नसल्याची माहिती दिली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.