Nagpur Cime News: सर्वसामान्य नागरिकांमध्ये मोठ्या पगाराच्या नोकरीचे आकर्षण अद्यापही कायम असल्याचा प्रत्यय नागपुरमध्ये पुन्हा एकदा आला. अमेरिकेमधील अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’मध्ये नोकरी लावून देण्याच्या नावाखाली फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. एक-दोन नव्हे तर तब्बल 111 जणांची फसवणूक झाली आहे.
ओमकार तलमले असे फसवणूक करणाऱ्याचं नाव असून ओमकारने या 111 जणांकडून तब्बल 5 कोटी 31 लाख 70 हजार रुपये लुबाडले आहेत. याप्रकरणी ओमकारला नागपूर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
फसवणूक झालेल्या तरुणांनी पोलिसांना दिलेल्या माहितीप्रमाणे ओमकार तलमले याने तो 2017 पासून नासामध्ये वैज्ञानिक म्हणून कार्यरत असल्याचे सांगितले होते. तो आपल्या संपर्काच्या माध्यमातून नासा आणि इस्रो सारख्या संस्थांमध्ये नोकरी लावून देतो. अशी स्वप्न तरुणांना दाखवत होता.
त्यांच्याकडून टप्प्याटप्प्याने लाखो रुपये लुबाडत होता. ओमकार ने अनेक तरुणांना नासाच्या खोट्या लेटर पॅडवर अपॉइंटमेंट लेटर ही पाठवले होते. सध्या ओंकार तलमले हत्येच्या प्रकरणात नागपूर ग्रामीण पोलिसांच्या कोठडीत आहे.
एका आठवड्यापूर्वी नागपूर शहरात पैशांचे आमिष दाखवून दोन व्यापाऱ्यांची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना कोंढळी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली होती. धक्कादायक बाब म्हणजे हत्या केल्यानंतर दोघांचाही मृतदेह जाळून नदीत फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
अंबरीश गोळे आणि निरालाकुमार सिंग अशी मयत व्यापारांची नावे आहेत. याप्रकरणी कोंढाळी पोलिसांनी पाच मारेकऱ्यांना अटक केली होती. अंबरीश हे कंत्राटदार होते तर निराला सिंग यांचा कापड विक्रीचा व्यवसाय होता. याप्रकरणात ओंकार तलमलेचा देखील हात होता.
सध्या ओंकार तलमले हत्येच्या प्रकरणात नागपूर ग्रामीण पोलिसांच्या कोठडीत आहे. लवकरच नागपूर शहर पोलीस फसवणुकीच्या या प्रकरणात त्याचा ताबा घेणार आहे आणि त्यानंतर फसवणुकीच्या या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.