Nagpur city special for Shiv Sena Sanjay Raut sakal
नागपूर

शिवसेनेसाठी नागपूर शहर खास : संजय राऊत

शिवसेनेच्या बैठका व भेटीगाठी रविभवनात!; संपर्कप्रमुखांना धक्का

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : शिवसेनेचे नेते आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी संपर्क प्रमुखांच्या कार्यालयातील भेटीगाठींचा कार्यक्रम रद्द करून पदाधिकाऱ्यांच्या सर्व बैठका रविभवन येथे घेण्याचे ठरविले आहे. राऊतांचा हा पवित्रा संपर्क प्रमुखांना एकप्रकारचे धक्का असल्याचे मानला जाते.

गणेशपेठ येथील शिवसेना भवन सोडून सर्व बैठका संपर्क प्रमुख आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांच्याच कार्यालयात घेतल्या जात असल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजी होती. शिवसेनेला खासगी मालमत्ता केल्याचा आरोप करण्यात येत होता. याची तक्रार मुंबईतील नेत्यांकडे करण्यात आली होती. त्यानंतर सर्व महत्त्वाच्या बैठका आणि स्थानिक पातळीवर धोरणात्मक निर्णय घेताना शिवसेना भवनचा वापर करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतरही परिस्थिती फारशी बदलली नव्हती. वर्षभरात बोटावर मोजण्याइतक्या बैठका शिवसेना भवन येथे पार पडल्या. संजय राऊत यांचा कार्यक्रम आखताना महानगर प्रमुख प्रमोद मानमोडे आणि किशोर कुमेरिया यांच्याकडे असलेल्या

शिवसेनेच्या बैठका व भेटीगाठी रविभवनात!

विधानसभेचा आढावा घेण्यासाठी संपर्क प्रमुखांच्या कार्यालयातच बैठका लावण्यात आल्या होत्या. त्यामुळे पुन्हा नाराजीचा सुरू उमटू लागला होता. तो संजय राऊत यांच्या कानावर टाकण्यात आला. त्यामुळे त्यांनी संपर्क प्रमुखांच्या घरी भोजन आणि कार्यालयाला भेट हा कार्यक्रम कायम ठेवला. बैठका मात्र रविभवनच्या सभागृहात घेण्याचा निर्णय घेतला आहे. संजय राऊत यांचे सोमवारी रात्री शहरात आगमन झाले. मंगळवारी साडेअकरा वाजता ते प्रेस क्लब येथे पत्रकारांसोबत संवाद साधणार आहेत. दीड वाजता संपर्क प्रमुख दुष्यंत चतुर्वेदी यांच्या घरी भोजन, तीन वाजता महानगर प्रमुख किशोर कुमेरिया, चार वाजता प्रमोद मानमोडे यांच्यासोबत भेट व चर्चा. पाच वाजता आजी-माजी शिवसैनिकांसोबत चर्चा. बुधवारी (ता.२३) नागपूर ग्रामीणचा दौरा.

आजी-माजींमध्ये संतुलनाचा प्रयत्न

आजी-माजी शिवसैनिकांच्या भेटीसुद्धा ते रविभवन येथेच घेणार आहेत. तसा सुधारित दौराही जाहीर करण्यात आला आहे. भोजन संपर्क प्रमुखांच्या घरी आणि बैठका रविभवन येथे ठेवून संजय राऊत यांनी जुन्या-नव्या शिवसैनिकांमध्ये समतोल साधला आहे. संजय राऊत यांच्यासोबत खासदार कृपाल तुमाने, खासदार संजय शेवाळे, खासदार प्रियांका चतुर्वेदी हेसुद्धा उपस्थित राहणार आहेत.

शिवसेनेची ताकद फक्त मुंबईपुरती मर्यादित नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात आहे. शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून विदर्भ आणि मराठवाड्यात ती आखणी वाढवण्यात येत आहे. मुंबईप्रमाणे नागपूरसुद्धा आम्हाला प्रिय असल्याने आपण तीन दिवस येथेच मुक्काम करणार असल्याचे शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी सांगितले.

शिवसंपर्क अभियानासाठी संजय राऊत सोमवारी रात्री नागपूरला दाखल झाले. यावेळी त्यांनी विमानतळावर पत्रकारांसोबत संवाद साधला. विदर्भ आणि मराठवाड्यात शिवसंपर्क अभियान सुरू करा, असे पक्षप्रमुखांनी आदेश दिले. त्यानुसार मराठवाडा आणि विदर्भात सगळेच खासदार आता कामासाठी निघाले आहे.

शिवसेनेसाठी नागपूर शहर खास : राऊत

नागपूर हे उपराजधानीचे शहर आहे. त्यामुळे मी इथेच थांबणार आहे. विदर्भ आणि मराठवाडामध्ये पक्षाचे जे संघटन आहे ते अधिक वाढावे, मजबूत व्हावे, लोकसभा व विधानसभा तसेच येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करावे यासाठी उद्यापासून आमचे सगळे खासदार विदर्भ आणि मराठवाड्याच्या जिल्ह्यात पोहोचतील. त्यांच्यासोबत मुंबई-ठाण्यातील २०-२० कार्यकर्त्यांची चमू असेल. चार दिवसानंतर आम्ही सगळे मुंबईला भेटू आणि उद्धव ठाकरे यांना अहवाल सादर करणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.

मोदी साहेब खूप काम करतात. ते फक्त दोन तास झोपतात हा चांगला प्रयोग आहे. मात्र, आता उरलेले दोन ताससुद्धा त्यांना झोपू द्यायचे नाही असे बहुतेक महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांनी ठरवले आहे. त्यानुसार भाजपचे नेते कामाला लागले असल्याचा टोला त्यांनी हाणला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT