Nagpur Congress aggressive against Prime Minister statement sakal
नागपूर

नागपूर : पंतप्रधानांच्या वक्तव्याविरोधात काँग्रेस आक्रमक

संविधान चौकात जोरदार आंदोलन; शेकडो कार्यकर्त्यांचा सहभाग

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : देशभरात काँग्रेसने कोरोना पसरवला असा आरोप करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याविरोधात बुधवारी काँग्रेसच्यावतीने संविधान चौकात ‘शर्म करो मोदीजी...''अशा घोषणा देऊन आंदोलन केले. ‘नमस्ते ट्रम्प’ या कार्यक्रमाच्या माध्यमातूनच मोदी यांनी देशभरात कोरोना पसरवल्याचा आरोपही यावेळी काँग्रेसच्या नेत्यांनी केला.

शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यात आजी-माजी मंत्र्यांसह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. बिहार, पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ,पाँडेचेरी या राज्यात विधानसभा निवडणुका घेतल्या. त्यामुळे कोरोना पसरविण्याचे काम हे केंद्र सरकारनेच केले आहे.

आता उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणूक डोळयासमोर ठेवून स्वतःचे पाप महाराष्ट्रावर लादण्याचा केविलवाणा प्रयत्न नरेद्र मोदी करीत आहेत. मोदींनी जनतेचा कुठलाही विचार न करता थेट लाकडाउन लावले. या दरम्यान दळणवळण यंत्रणासुद्धा बंद केली होती. यामुळे परराज्यातील मजुरांना, मुलाबाळांना घेऊन हजारो किलोमीटर पायी चालायला लावले. मोदी यांच्या अमानवीय निर्णयामुळे अनेकांना प्राणसुद्धा गमवावे लागले होते,अशी टीका यावेळी करण्यात आली.

आंदोलनात अनिस अहमद, विशाल मुत्तेमवार, अतुल कोटेचा,संजय महाकाळकर, नंदा पराते, नैश अली, गिरीश पांडव, डॉ.गजराज हटेवार, रमण पैगवार, प्रशांत धवड, तनुज पांडे, दिनेश तराळे, ईरशाद अली, डॉ.सुधीर आघाव, मिलिंद दुपारे, डॉ.मनोहर तांबुलकर, डॉ. प्रकाश ढगे, ज्ञानेश्वर ठाकरे, राजेश पौनीकर, पंकज निघोट, मोतीराम मोहाडीकर, युवराज वैद्य,अब्दुल शकील, पंकज थोरात, सुरज आवळे, गोपाल पट्ट्म, सुनिता ढोले, राजकुमार कमनानी, रजत देशमुख, विश्वेश्वर अहीरकर, प्रवीण गवरे, सर्फराज खान, सुनिल पाटील, ईरशाद मलिक, प्रमोद ठाकूर, बालू शेख, नगरसेवक रमेश पुणेकर, मनोज सांगोळे, संदीप सहारे, भावना लोणारे, स्नेहा विवेक निकोसे, रश्मी राऊत, आयशा उईके, जुल्फीकार अली भुटटो, ॲड. अभय रणदिवे, अण्णाजी राऊत, लंकेश उके, विवेक निकोसे, प्रशांत ढाकणे, गुडडु तिवारी, सुजाता कोंबाडे, नरेश शिरमवार,राजेश कुंभलकर आदी सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT