Nitin Gadkari vs Vikas Thakre 
नागपूर

Nagpur Lok Sabha Election Results: नागपूरची पसंती रोडकरींच्या विकासाला, गडकरींनी दिला ठाकरेंना धोबीपछाड

कार्तिक पुजारी

Nagpur Nitin Gadkari Won- भारताच्या शब्दश: केंद्रस्थानी असलेल्या नागपूरच्या लढतीकडे देशाचं लक्ष लागलं होतं. याठिकाणी अपेक्षेप्रमाणे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना विजय झाला आहे. गडकरींनी देशभरात विकास कामे करुन स्वत:ची आणि नागपुरची वेगळी ओळख निर्माण केली आहे. गडकरी हे तिसऱ्यांदा भाजपकडून लोकसभेच्या रिंगणात होते. तर, काँग्रेसने त्यांच्या विरोधात विकास ठाकरे यांना तिकीट दिलं होतं. नागपूरमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत होती.

उमेदवार----------------------------मतं----------------------मताधिक्य

नितीन गडकरी------------ ६,५५,०२७ मतं (५४.१ टक्के)---- १ लाख ३७ हजार

विकास ठाकरे-------------- ५,१७,४२४ (४२.७ टक्के )

नितीन गडकरी यांनी या मतदारसंघामध्ये मोठ्या मताधिक्याचा दावा केला होता. माझ्या कामाच्या जिवावरच लोक मला निवडून देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. दुसरीकडे, विकास ठाकरे यांच्या विजयासाठी काँग्रेसने चांगलाच जोर लावला होता. त्यामुळे नागपुरकर नेमकं कुणाच्या बाजूने कौल देतात हे पाहणं औत्सुक्याचं होतं. अखेर नागपूरकरांनी गडकरींच्या बाजूने कौल दिला आहे.

नागपुरमधील विधानसभा मतदारसंघांची स्थिती

नागपुरची लोकसंख्या ४६,५३,५७० इतकी आहे. नागपूरमध्ये एकूण १२ विधानसभा मतदारसंघ आहेत. कधीकाळी नागपूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जायचा, पण २०१४ मध्ये नितीन गडकरींनी पहिल्यांदा खासदारकीची निवडणूक लढवली, त्यानंतर ते सलग दोनवेळा या मतदारसंघातून विजयी झाले. २०१४ पेक्षा २०१९ मध्ये गडकरींना जास्त मतं मिळाली होती. गडकरींना २०१९ मध्ये ६,५७,६२४ इतकी मतं मिळाली होती.

२०१९ मध्ये गडकरींना काँग्रेसने नाना पटोले यांनी आव्हान दिले होते. पटोलेंचा पराभव झाला खरा पण त्यांनी ४ लाखांपेक्षा जास्त मतं घेतली होती. त्यामुळे पटोलेंनी गडकरींना चांगली लढत दिली असं बोललं गेलं. यंदा काँग्रेसने नागपुरमध्ये त्यांच्या तुल्यबल उमेदवार दिला नाही अशी चर्चा सुरु झाली होती.

तसं पाहिलं तर विकास ठाकरे यांनी लढत एकतर्फी होऊ दिली नाही. विकास ठाकरे हे स्थानिक नेते आहेत. नागपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष आणि नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे ठाकरे आमदार आहेत. जवळपास तीन दशकांपासून ते काँग्रेसशी जोडले गेले आहेत. शिवाय ते कुणबी समाजातून येत असल्याने याचा देखील त्यांना फायदा होईल असं सांगितलं जातं होतं. नागपुरमध्ये आलेल्या पुराचा फटका गडकरींना बसेल असाही एक सूर होता.

निकालावर परिणाम करणारे घटक

  • शहरातील विकासाची कामे

  • नितीन गडकरी यांचा वैयक्तिक करिष्मा

  • जातीय ध्रुवीकरण टळले

  • घसरलेला मतदानाचा टक्का

  • कडक उन्हामुळे मतदानाप्रती नागरिकांची उदासीनता

  • लढवय्या नेता म्हणून आमदार विकास ठाकरे यांची प्रतिमा

  • मुस्लिम आणि एससी मतांचा निश्चित अंदाज न लागणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT