नागपूर : गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने वाढणारा कोरोना बाधितांचा आलेख किंचित खाली आला. गेल्या चोवीस तासांमध्ये जिल्ह्यात ४० नवे कोरोना बाधित आढळून आले. कालच्या तुलनेत बाधित कमी असले तरी चिंता कायम आहे. सक्रिय रुग्णांची संख्या १८६ पर्यंत पोहोचल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.(Nagpur Covid Updates)
शहरात कोरोना बाधितांची संख्या दोन दिवस चांगलीच वाढली. गेल्या चोवीस तासांत मात्र जिल्ह्यात ४० बाधित आढळून आले. कालच्या तुलनेत ही संख्या कमी असली तरी शहरात दररोज २५ पेक्षा जास्त बाधित आढळून येत असल्याने शहरवासींनी काळजी घेण्याची गरज आहे. नव्या ४० बाधितांमध्ये शहरातील २७ जणांचा समावेश आहे. ग्रामीण भागातही १२ बाधित आढळले असून जिल्ह्याबाहेरील एकाचा समावेश आहे.
३६ चाचणी केंद्र सुरू
कोरोनाचे तत्काळ निदान व्हावे, यासाठी महापालिकेने सिव्हिल लाईन येथील केंद्रीय कार्यालयासह ३६ चाचणी केंद्र सुरू केले असून आज सुटीच्या दिवशीही हे केंद्र सुरू होते. दरम्यान, आज २ हजार ३६० चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील चाचण्यांची संख्या ५४ लाख ३३ हजार ३३ पर्यंत पोहोचली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.