Nagpur Corona patient rise 25 victims registered in 24 hours sakal
नागपूर

नागपूर : कोरोनाची अचानक उसळी

प्रशासन हादरले : २४ तासांत २५ बाधितांची नोंद

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : आता कुठे बाजारपेठा फुलल्या असताना आणि शाळा, महाविद्यालये पूर्ण क्षमतेने सुरू होण्याच्या स्थितीत असताना कोरोना पुन्हा उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात २५ रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. २५ पैकी १५ रुग्ण शहरात आढळले. आता जिल्ह्यात सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या ५३ वर पोहचली आहे. ‘सावधान..तो येतोय..काळजी घ्या, मास्क घाला, अंतर राखा’ अशा आशयाचे वृत्त दैनिक ‘सकाळ’ने दोनच दिवसांपूर्वी प्रकाशित केले होते.

मंगळवारी आढळलेल्या कोरोनाबाधितांमध्ये शहरातील १५, ग्रामीणमधील ७, जिल्ह्याबाहेरील ३ अशा एकूण २५ रुग्णांचा समावेश आहे. नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागाने कोरोनाबाधित रुग्णांकडून घेतलेल्या माहितीनुसार ४ रुग्ण हे मुंबईला, १ दुबईला, १ पाटणा, १ अंजनगाव सुर्जी तसेच केरळ येथे जाऊन आलेले आहेत. जिल्ह्यात २४ तासांमध्ये ५ जणांनी कोरोनावर मात केली.मात्र अचानक २५ बाधितांची भर पडल्याने सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या पन्नासपेक्षा अधिक झाली आहे. बाधितांच्या संपर्कातील नागरिकांची माहिती घेतली जात आहे. रुग्णवाढीमुळे जिल्ह्यात कोरोना संक्रमण वाढते की काय? याकडेही लक्ष लागले आहे. दरम्यान, या सर्व नवीन रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे असून सगळ्यांची प्रकृती स्थिर असल्याचा महापालिकेच्या आरोग्य विभागाचा दावा आहे. विशेष असे की, एक दिवसापूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिल्लीतील प्रवाशांमुळे कोरोनात वाढ होण्याची शक्यता असल्याचे सूतोवाच केले होते, परंतु, दिल्ली नाही तर मुंबईहून आलेल्या ४ रुग्णांमुळे अचानक कोरोना वाढल्याचे दिसून आले.

सक्रिय कोरोनाबाधित

शहरात 34

ग्रामीण 18

झोननुसार कोरोनाबाधित

  • मंगळवारी झोन -६

  • सतरंजीपुरा झोन-२

  • लक्ष्मीनगर झोन-२

  • धरमपेठ झोन-२

  • हनूमाननगर झोन-१

  • ग्रामीण भाग -७

  • जिल्ह्याबाहेरचे -३

दोन पोलिसांसह, दोन वृद्धांना बाधा

मंगळवारी आढळून आलेल्या कोरोनाबाधितांमध्ये दोन पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यात एकजण गिट्टीखदान पोलिस ठाण्यातील तर दुसरा मुख्यालयातील जवान आहे. एका ९४ वर्षीय वृद्धासह ६४ वर्षांच्या वृद्धेलाही कोरोनाची बाधा झाली. या दोघांच्याही काही तपासण्या करण्यात आल्यावर त्यांना गृहविलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT