नागपूर

नागपूरकरांनो, कोरोनाचा प्रकोप ओसरतोय; मृत्यूचा आकडाही कमी

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : जिल्ह्यात महिनाभरापूर्वी कोरोनाचा उद्रेक (Nagpur Corona Update) दिसून आला होता. दुसरी लाट आता ओसरली असे सांगण्यात येत असून मागील २४ तासांमध्ये ३० जणांचा मृत्यू झाला आहे. तर शहरात ७२६ तर ग्रामीण भागात ३९६ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. जिल्हाबाहेरच्या ११ जणांसह एकूण १ हजार १३३ जणांना बाधा झाली. यामुळे कोरोना आता नियंत्रणात आला असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. (Nagpur Corona Update new 1133 positive today)

जिल्‍ह्यात होणाऱ्या कोरोना चाचण्यांच्या तुलनेत कोरोनाबाधित अहवाल (पॉझिटिव्हीटी) ३२ टक्क्यांहून अधिक पोहचला होता. परंतु आता मे महिन्याच्या सुरवातीपासूनच जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती सामान्य झाली आहे. रविवार (ता. १६) जिल्ह्यात चाचण्यांच्या तुलनेत केवळ ७.२९ टक्के म्हणजेच १ हजार १३० जणांचेच अहवाल बाधित आढळले. कोरोनाबाधितांच्या तुलनेत ४ पट कोरोना रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

कोरोनाबाधितांचा दर ५ टक्क्यांहून खाली आणण्यासाठी जिल्हा प्रशासनही प्रयत्नशील आहे. परंतु ते अद्याप शक्य झाले नाही. तपासण्याची संख्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व त्वरित बाधितांची ओळख पटवून त्याच्यावर औषधोपचार याचा अवलंब करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. रविवारला शहरात १० हजार ६२३ तर ग्रामीणमध्ये ४ हजार ९३१ अशा १५ हजार ५५४ चाचण्या झाल्या आहेत. त्यापैकी केवळ ७.२९ टक्के १ हजार १३३ जणांचे अहवाल बाधित आढळले. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४ लाख ६३ हजार २४३ वर जाऊन पोहचली आहे.

रविवारला शहरात ९ तर ग्रामीणमध्ये १० असे जिल्ह्यात केवळ १९ कोरोना मृत्यू झाले. तर जिल्ह्याबाहेरील ११ रुग्णांचाही नागपुरातच उपचारादरम्यान झाला यामुळे कोरोना मृत्यूंची संख्या ३० नोंदवली गेली. यामुळे एकूण कोरोनामृतांची संख्या ८ हजार ५५० झाली आहे. सद्यस्थितीत शहरात १५ हजार ०१२ व ग्रामीणमध्ये १४हजार ८३१ असे २९ हजार ८४३ इतकेच कोरोना रुग्ण आहेत. केवळ साडेपाच हजार रुग्ण आता मेयो, मेडिकलसह इतर शासकीय व खासगी कोविड रुग्णालयात दाखल आहेत. तर २३ हजार ५६ जण गृह विलगीकरणात आहेत.

बाधितांच्या तुलनेत चारपट कोरोनामुक्त

शहरात कोरोनाबाधितांच्या तुलनेत रविवारी चार पट व्यक्तींनी कोरोनावर मात केली. शहरातील २ हजार ७०५ व ग्रामीणचे १ हजार ८१४ असे तब्बल ४ हजार ५१९ जणांनी कोरोनाला हरवले. ठणठणीत होऊन ते आपल्या घरी परतले. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनामुक्तांची संख्या ४ लाख २४ हजार ८५० झाली. यामुळे कोरोनामुक्तांचा रिकव्हरी दर वाढून ९१.७१ झाला आहे.

(Nagpur Corona Update new 1133 positive today)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

SCROLL FOR NEXT