नागपूर : भारतीयांचे सर्वात लोकप्रिय पेय कोणत? अस विचाराल तर आपसूकच चहाचे नाव समोर येईल. चहाला वेळ नसली तरी चालेल पण वेळेला मात्र चहा हवाच'', असंच काहीसे चहाप्रेमींचे आहे. हे लक्षात घेऊनच नवरात्रीच्या निमित्ताने जिवीका राय -अहिरकर हिने नऊ प्रकारचे फ्लेवर चहा विकसित केलेत. ते पिण्यासाठी हॉटेलमध्ये जाण्याची गरज नाही तर घरच्या घरी तयार करून त्याचा आनंद घेता येणार आहे.
चहा रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करू शकते. ग्रीन टीमध्ये दुधाचा वापर केला जात नाही. विविध आजारांचे प्रमाण वाढू लागल्याने शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवणे गरजेचे झालेले आहे. आयुष मंत्रालयाने कोरोनाच्या काळात काढा, तुळशीचा चहा, गरम पाण्याचे सेवन यासारख्या घरगुती उपचारपद्धती सामान्य लोकांसाठी शेअर केल्यात. जर नियमित आणि योग्य प्रमाणात चहाचे सेवन केल तर श्वसन विकारांपासून बचाव होऊ शकतो.
कोरोनाच्या काळात चहाचे महत्त्व वाढल्याचे लक्षात आल्याने जिवीकाने वडील अनिल अहिरकर यांच्या मार्गदर्शनात विविध प्रकारचे फ्लेवर चहा तयार करण्याचा संकल्प केला. इंस्टंट फुडच्या क्षेत्रात चांगली संधी असल्याचे लक्षात आल्याने जिवीकाने अनेक संशोधने वाचली. अनेकांसोबत चर्चाही केली.
तिने नैसर्गिक साहित्यांचा वापर करून विविध प्रकारचे चहाचे फ्लेवर तयार करण्यासाठी परिश्रम घेतले. त्यातून नऊ ते दहा प्रकराच्या फ्लेवर चहाची निर्मिती झालेली आहे. त्यात मसाला, चॉकलेट, इराणी, अद्रक, पान चहा, बटर स्कॉच, व्हॅनिला, रोज, केसर चहाचा समावेश आहे. सर्वच चहा नैसर्गिक आहेत. यामुळे हा चहा पिण्यासाठी आता हॉटेल अथवा इतरत्र जाण्याची गरज नाही.
नऊ प्रकारच्या चहाची निर्मिती करणारी ‘नवदुर्गा’
घरीच चहा तयार करून आनंद घेऊ शकणार आहेत. सोबतच ग्रीन टीही आणली आहे. तिची बाजारपेठही मोठी असून सतत वाढत असल्याचे जिवीका हिने सांगितले.
जिवीका हिने बी. कॉमचे शिक्षण घेतले असून सीए होण्याची इच्छा होती. मात्र, लग्नानंतर शिक्षणात खंड पडल्याने सीए होता आले नाही. मात्र, इंस्टंट फुडच्या व्यावसायात शाही इंस्टंटच्या माध्यमातून इंस्टंट खाद्याच्या क्षेत्रात चार वर्षात तिने पाय रोवले आहेत. व्यवस्थापन आणि मार्केटिंगच्या जोरावर व्यवसायाला नवीन झळाळी देत आहे. जिवीकाला आरव हा मुलगा असून पती वैभव यांचे प्रोत्साहन तिच्यासाठी मोलाची ठरली आहे. ती माजी नायब राज्यपाल डॉ. रजनी राय यांची नात सून आहे. संपन्नता असतानाही स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी वडिलांच्या मदतीने व्यवसायात प्रवेश करुन आपली ओळख तिने निर्माण केली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.