Nagpur Crime Esakal
नागपूर

Nagpur Crime: कारागृहातून सुटले, घरफोडी करायला लागले...दोघांना अटक ; सहा गुन्ह्यांचा उलगडा

कारागृहातून सुटून आल्यावर दोन घरफोड्यांनी पुन्हा पारडीसह इतर ठिकाणी घरफोडी केल्याची माहिती उघडकीस आली आहे. पारडी पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक करून सहा घरफोडींचा खुलासा केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Nagpur Crime: कारागृहातून सुटून आल्यावर दोन घरफोड्यांनी पुन्हा पारडीसह इतर ठिकाणी घरफोडी केल्याची माहिती उघडकीस आली आहे. पारडी पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक करून सहा घरफोडींचा खुलासा केला आहे.

मोहम्मद फय्याज एजाज अंसारी ( वय २२, रा. गंगाबाग, पारडी), अफरोज शमशाद अंसारी, (वय २२, रा. गिरजा नगर, पारडी) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ फेब्रुवारीला मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास अंबेनगर येथील मारोती सोसायटीमध्ये राहणारे देवीप्रसाद गोबऱ्यासाव जामुनपानी (वय ४५) हे बालाघाटला गेले असताना, त्यांच्या घरात शिरून चोरट्याने २० हजार रोख रकमेसह सोन्याचे दागिने, असा ९५ हजार ७५० रुपयांचा ऐवज चोरून नेला.

त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून पोलिस निरीक्षक रणजीत सिरसाट यांच्या नेतृत्वात आरोपींचा शोध सुरू केला. तपासात चोरटे हे रेकॉर्डवरील आरोपी असल्याची बाब समोर आली. ते आठ ते दहा दिवसांपूर्वीच कारागृहातून सुटून आल्याचे निदर्शनास येताच, त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी वाठोडा, नंदनवन, कन्हान, कुही येथेही घरफोडी केल्याची कबुली दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करीत अटक करून चौकशी सुरू केली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोणत्या अम्पायरला 'Stumps' एवढे मोठे दिसायचे? सचिन तेंडुलकरचा प्रश्न अन् Steve Bucknor ट्रोल, इरफान पठाणचीही प्रतिक्रिया

मोठी बातमी: रोहित शर्मा पहिल्या कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियात होतोय दाखल, सोबत भारी गोलंदाजही टीम इंडियाच्या मदतीला येतोय

'राष्ट्रवादी फुटीनंतर पक्ष सोडून गेलेल्‍या गद्दारांना पाडाच'; शरद पवारांचा अजितदादांच्या आमदारांना इशारा

Ajit Pawar: पार्थ पवार म्हणतात, भाजप-शिवसेनेसोबत गेल्याने आम्ही बदलणार नाहीत; आम्ही तर...

Fraud Calls : अलर्ट! या नंबरवरुन येणारे कॉल आहेत धोक्याचे; क्षणात होऊ शकतो मोबईल हॅक अन् अकाउंट रिकामं

SCROLL FOR NEXT