Nagpur Police Vacant Positions of Inspector: देशभरात लोकसभा निवडणुकींचे वारे वाहू लागले आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार स्थानिक आणि तीन वर्ष पूर्ण झालेल्या पोलिस निरीक्षकांची बदली करण्याचे आदेश आहेत. यामध्ये शहरातील १४० पैकी बहुतांश पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्यात. मात्र, त्या जागेवर आत्तापर्यंत केवळ १७ पोलिस निरीक्षक हजर झाले. अद्याप ७५ पोलिस निरीक्षकांची पदे रिक्त असल्याने शहरातील क्राईम कंट्रोल कसे होणार असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे.
देशात लोकसभा निवडणुका एप्रिल महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने संपूर्ण देशात पोलिसांच्या बदल्यांचे सत्र सुरू आहे. त्यानुसार नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्रात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह पोलिस निरीक्षकांचाही बदल्या करण्यात आल्यात. त्यासाठी स्वतःचा जिल्हा आणि मागील चार वर्षातील तीन वर्ष ३० जून २०२४ पर्यंत पूर्ण होतील अशा सर्वच पोलिसांच्या बदल्या करण्यात आल्या.
त्यानुसार नागपुरातून जवळपास ४७ जणांच्या पिंपरी चिंचवड तर इतर पोलिस निरीक्षकांच्या इतरत्र बदल्या करण्यात आल्या. मात्र, या निर्णयाविरोधात काही पोलिस निरीक्षक महाराष्ट्र प्रशासकीय लवाद (मॅट)मध्ये गेले. त्यामुळे ३१ डिसेंबर २०२३ मध्ये तीन वर्षांचा कालावधी पूर्ण करणाऱ्या पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्याचे आदेश काढण्यात आले.
त्यामुळे शहरातील साईड पोस्टिंगवर असलेल्या अधिकाऱ्यांचीही बाह्य जिल्हा बदली करण्यात आली. शहरातील विविध ठाण्यासह, गुन्हे शाखा, विशेष शाखा, वाहतूक आणि इतर विभागांमध्ये कार्यरत असलेल्या जुन्या पोलिस निरीक्षकांचा समावेश होता.
पोलिसांवरही कामाचा ताण
गेल्या महिनाभरापासून शहरात खुनाचे सत्र सुरू आहे. याशिवाय विविध गुन्हेगार शहरात सक्रिय झाले आहेत. त्यामुळे यावर वचक बसविण्यासाठी पोलिस निरीक्षकांसह दुय्यम पोलिस निरीक्षक, साहाय्यक निरीक्षकांचीही गरज आहे. मात्र, १४० पैकी केवळ ६५ पोलिस निरीक्षकच शिल्लक आहेत. असे चित्र असल्यास क्राईम कंट्रोल कसे होईल हा प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी कार्यरत पोलिसांवरही कामाचा ताण वाढल्याचे चित्र दिसून येत आहे.
वाहतूक विभाग रिकामा
शहरात गेल्या दीड वर्षांपासून वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. ७०० पैकी केवळ चारशे कर्मचाऱ्यांकडून वाहतूक विभागाचा गाडा ओढण्यात येत आहे. अशावेळी बदल्यांमध्ये कॉटन मार्केट, सीताबर्डी, सक्करदरा आणि इतर ठिकाणच्या पोलिस निरीक्षकांची बदली झालेली आहे. त्यामुळे वाहतूक विभाग संपूर्णतः रिक्त असल्याचे चित्र दिसून येते. (Latest marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.