crime news esakal
नागपूर

Nagpur Crime : क्षुल्लक वादातून पत्नीचा चिरला गळा

चाकूने केला वार स्वत:च घेऊन गेला रुग्णालयात

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - पती- पत्नीमध्ये झालेल्या क्षुल्लक भांडणातून रागाच्या भरात पत्नीचा चाकूने गळा चिरल्यावर पत्नीने तिला रुग्णालयात नेले. मात्र वेळ निघून गेली होती. डॉक्टरांनी तपासून पत्नीला मृत घोषित केले. ही खळबळजनक घटना गुरुवारी सायंकाळी मानकापूर ठाण्यांतर्गत घडली.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

बिस्ताबाई चंद्रदयाल मसकुले (वय २५ रा. स्नेह कॉलनी, प्रकाशनगर) असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी बिस्ताचा पती चंद्रदयाल समलू मसकुले (वय २६) याला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मसकुले दाम्पत्याला एक ३ वर्षांचा मुलगा आहे. दोघेही मूळचे मध्यप्रदेशच्या सिवनी येथील रहिवासी आहेत. ते मजुरीसाठी नागपुरात आले होते. गुरुवारी (ता.२१)सायंकाळी चार वाजताच्या सुमारास मुलाला भूक लागल्यामुळे तो वारंवार आईला जेवण मागत होता. बिस्ताबाई त्याच्या जेवणाची तयारी करीत होती. मुलाच्या रडण्याला वैतागून चंद्रदयालचा पारा चढला.

त्याने पत्नीला शिवीगाळ करून वाद घातला. दोघांत कडाक्याचे भांडण झाले. चंद्रदयालने रागात येऊन स्वयंपाकखोलीत ठेवलेला चाकू आणला आणि बिस्ताच्या गळ्यावर वार केला. रक्ताची धार लागली. त्यानंतरही त्याचा राग शांत झाला नाही. त्याने तिच्या पोटावर सपासप वार करून रक्ताच्या थारोळ्यात लोळवले.

काही वेळाने चंद्रदयालचा राग शांत झाला. आपल्या हातून मोठी चूक झाल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने आरडा-ओरड करून शेजाऱ्यांना मदतीसाठी बोलावले. बिस्ताबाईला ऑटोमध्ये टाकून मानकापूरच्या खासगी रुग्णालयात घेऊन गेला. मात्र डॉक्टरांनी तपासताच तिला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच मानकापूरच्या ठाणेदार शुभांगी वानखेडे घटनास्थळावर पोहोचल्या. झोन २ चे डीसीपी राहुल मदने यांनीही घटनास्थळाचा आढावा घेतला. पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून चंद्रदयाल याला अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

सोलापूर जिल्ह्यातील ११ आमदारांनी किती घेतली मते? दुसऱ्या- तिसऱ्या क्रमांकावर कोण? जाणून घ्या, जिल्ह्यातील विजयी अन्‌ दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांची मते

Amol Javle Won Raver Assembly Election 2024 Result Live: रावेर विधानसभा मतदार संघातून अमोल जावळे विजयी

SCROLL FOR NEXT