शवदाहिनी मशीन  sakal
नागपूर

Nagpur : दहनघाटाला हवा दुरुस्तीचा बूस्टर

प्लास्टर उखडलेले, शोकसभागृहही दयनीय प्लास्टर उखडलेले, शोकसभागृहही दयनीय

Akhilesh Ganvir

सहकारनगर : महापालिकेने सहकारनगर दहनघाटाचे बांधकाम चांगले केले. मात्र, त्यानंतर देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने घाटावर विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. परिसरातील नागरिकांनी घाटाच्या दुरुस्तीची गरज व्यक्त करून मनपा प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला.

लक्ष्मीनगर झोनअंतर्गत प्रभाग क्रमांक ३६ मध्ये सहकारनगर दहन घाट आहे. बांधकाम चांगले झाल्याने समस्या फारशा नाहीत. मात्र, बदलत्या काळानुसार व परिस्थितीनुसार सुविधा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. एवढ्या मोठ्या परिसरासाठी केवळ चार शेडची निर्मिती करण्यात आली आहे.

मात्र, हे चार शेड बरेचदा कमी पडत असल्याचे येथे देखरेख करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. कधी-कधी एकाच दिवशी ८ ते ९ अंत्यसंस्काराची गरज पडते. त्यामुळे शेड अपुरे पडत असल्याने मोठी कसरत करावी लागते. शेडच्या खाली पिंजऱ्याच्या बाजूला एकाचवेळी दोन-दोन अंत्यसंस्कार करण्याची परिस्थिती उद्भवत असल्याचे कर्मचारी स्वप्नील वाघमारे व अतुल इंगोले यांनी सांगितले. येथे आणखी तीन ते चार शेडची गरज असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले.

शेडच्या खालील ओट्याची फ्लेरिंग निघाली आहे. त्याचबरोबर ओट्याला मोठा खड्डा पडलेला आहे. पायऱ्यांचीसुद्धा दयनीय अवस्था आहे. त्याला पुन्हा नव्याने दुरुस्तीची गरज आहे. सौंदर्यीकरणामध्ये लॉन बनविण्यात आला. मात्र, देखभालअभावी खराब झाला आहे. घाटाच्या सभोवताल विजेचे खांब लावण्यात आले. कनेक्शन जोडण्यात आले नसल्याने लाईट लागले नाही.

त्यामुळे रात्रीच्या सुमारास हवा तसा प्रकाश पडत नसल्याचे स्थानिक नागरिक हुकूमचंद मिश्रीकोटकर यांनी सांगितले. शोक सभागृहमध्ये बसण्याची व्यवस्था नाही. केवळ दोन खुर्च्या नगरसेवकांच्या मदतीने लावण्यात आल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. अतिशय लहान असलेल्या या सभागृहात एकाचवेळी केवळ ५० लोकं उभे राहू शकतात. केवळ एकच पंखा असून, तीनपैकी दोन लाईट बंद आहेत.

बसण्याची व्यवस्था, पंखे तसेच लाईटची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी मिश्रीकोटकर व स्थानिक नागरिकांनी केली. एलपीजीवर आधारित शवदाहिनी मशीन आणि पर्यावरणपूरक मोक्षकाष्ठ निःशुल्क मिळण्याची चांगली सुविधा येथे आहे. मात्र, लाकडांसाठी पैसे मोजावे लागतात.

कचऱ्याची नियमित उचल नाही, जागोजागी ढीग

अंत्यसंस्काराचे साहित्य घाटावर पडून असते. परिसराची साफसफाई होत असली तरी, कचऱ्याची विल्हेवाट लावली जात नाही. नियमितपणे उचल होत नसल्याने कचरा मोठ्या प्रमाणात साचून राहतो. साईसफाईसोबतच कचरा नियमितपणे उचलला जावा. येथे येणाऱ्या लोकांना त्याचा त्रास होणार नाही, अशी अपेक्षा मिश्रीकोटकर यांनी व्यक्त केली.

अपुऱ्या पार्किंग व्यवस्थेमुळे येण्या-जाणाऱ्यांसह स्थानिकांमध्ये रोष

घाटावर येणारे नागरिक रस्त्यावरच दुचाकी व कार पार्क करतात. त्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी होते. या भागातील कॉलनी व नागरिकांच्या घरापुढे गाड्या लावत असल्याने त्यांना आवश्यक कामासाठी गाडी घेऊन बाहेर पडणे कठीण होते.

दररोज हीच परिस्थिती असते. गाड्यांच्या अस्ताव्यस्त पार्किंगमुळे स्थानिक नागरिकांमध्ये रोष आहे. महापालिका आणि नगरसेवकांना वारंवार सूचना देऊनही याची दखल घेतली जात नाही. येथे सुरक्षारक्षक तैनात केल्यास काही प्रमाणात ही समस्या सुटू शकते. त्यामुळे सुरक्षारक्षकाची नेमणूक येथे करण्यात यावी, अशी मागणीसुद्धा स्थानिक नागरिकांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीसाठी भाजपचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावर दाखल

Mumbai Assembly Election 2024 Results Live : मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT