Food Oil Sakal
नागपूर

नागपूर : दसरा, दिवाळीच्या तोंडावर खाद्यतेल भडकणार

सततच्या इंधन दरवाढीमुळे सणासुदीच्या तोंडावर लोकांना महागाईचा सामना करावा लागणार आहे.

राजेश रामपूरकर

नागपूर : सततच्या इंधन दरवाढीमुळे सणासुदीच्या तोंडावर लोकांना महागाईचा सामना करावा लागणार आहे. सध्या कांदा व इतर भाज्यांचे भाव आकाशाला भिडले असताना त्यात आता खाद्य तेलाच्या दरातही वाढ होऊ लागली आहे. पावसामुळे तेलबियांच्या पिकांचे नुकसान झाल्याने येत्या काही दिवसात भाववाढीचे संकेत दिले जात आहे. त्यामुळे गृहिणींचे बजेट चांगलेच बिघडणार आहे. दसरा आणि दिवाळीच्या तोंडावर तेलाच्या किमतीत वाढ झाल्याने सण बेचव होणार हे निश्चित झालेले आहेत. कोरोनामुळे उत्पादन कमी झाले असताना सततच्या दरवाढीने अनेकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

इंधन दरवाढ, सततच्या पावसामुळे तेलबियांचे झालेले नुकसान आणि आयात तेलावरील शुल्क कमी झाल्यानंतरही साठेबाजी वाढलेली आहे. या विविध कारणांमुळे तेलाच्या दरात सतत वाढ होताना दिसत आहे. सोयाबिन, पाम तेल, शेंगदाणे आणि सूर्यफुलाच्या दरात प्रति किलो चार ते पाच रुपयांची वाढ झालेली आहे.

यंदा पावसामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. काढणीला आलेले सोयाबिन काळा पडला असून अनेक सोयाबीन जळून गेले आहे. दरवर्षी सोयाबिन पिकांची आवक सप्टेंबर महिन्यात होते. मात्र, यंदा सततच्या पावसाने सोयाबिन पिकांचे मोठे नुकसान झाल्याने अद्यापही सोयाबिनची हवी तेवढी आवक झालेली नाही. भावही अचानकच कमी झाल्याने शेतकरीही अडचणीत सापडलेले आहेत. त्यामुळेही तेलाचे भाव वाढण्याची शक्यता नागपूर किरकोळ व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी सांगितले.

शेंगदाणे तेल १५ दिवसापूर्वी १५ किलो डब्ब्याचा भाव २३०० रुपये होता तो आता २४५० ते २५५० रुपयावर गेला आहे. सोयाबिन तेल २२८० रुपयांवरून २३८० तर सन फ्लॉवर २२०० रुपयांवरून २२५० रुपयावर गेले आहे. राजस्थानमध्ये मटकी आणि उडीद डाळीचे उत्पादन होते. यंदा त्या परिसरात पावसाने दमदार हजेरी लावल्याने या पिकांचे नुकसान झाले आहे.

उत्पादन घटल्याने प्रति क्विंटल मटकी ६०० ते ७०० रुपये तर उडीद डाळ ४०० ते ५०० रुपये प्रति क्विंटलने वाढलेले आहे. दिवाळीच्या काळात खाद्य पदार्थ करण्यासाठी याची मोठ्या प्रमाणात मागणी वाढत असल्याने अजून भाव वाढतील असेही देशमुख म्हणाले. बाजारपेठेत ग्राहकांची वर्दळ वाढली असून व्यापार रुळावर आलेला आहे. सणासुदीची खरेदीही जोमाने होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजयी उमेदवाराचे औक्षण करताना रसायनयुक्त गुलालामुळे उडाला भडका; सहा ते सात कार्यकर्ते भाजले, नेमकं काय घडलं?

Mahayuti Strike Rate: महायुतीचा जबरदस्त स्ट्राइक रेट! काय ठरले निर्णायक? विरोधकांचं झालं पानीपत

IND vs AUS 1st Test : नाद करा, पण Yashasvi Jaiswal चा कुठं? ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरी धुतले; गावस्कर, तेंडुलकर, कांबळी यांच्याशी बरोबरी

Latest Maharashtra News Updates : राज्य निवडणूक आयोगाचे अधिकारी आज संध्याकाळी राज्यपालांची घेणार भेट

खोट्या अफवा पसरवणाऱ्यांविरुद्ध ए आर रहमानने जारी केली कायदेशीर नोटीस ; "या अफवेमुळे माझ्या कुटूंबाला त्रास..."

SCROLL FOR NEXT