Nagpur news esakal
नागपूर

Nagpur : दीक्षाभूमीवर ६६ वर्षांपूर्वी बाबासाहेबांनी दिला तथागताचा धम्म

धम्मचक्र प्रवर्तन दिन : पुस्तकांसह विविध वस्तुंच्या स्टॉल्सची गर्दी

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : जनसागर उसळला होता, विस्तीर्ण पटांगण. रमापती डेकोरेशनतर्फे खास उभारलेला मंडप. एका बाजूला मंच. सकाळचे दहा वाजले होते आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मंचावर आगमन झाले. त्यांनी हात उंचावून अभिवादन केले. पटांगणातील निळ्या पाखरांची नजर त्यांच्यावर स्थिरावली होती. विस्तीर्ण पसरलेल्या भीमसागर एकच जल्लोष करीत होता. बाबासाहेब करे पुकार...बुद्ध धम्मका करो स्वीकार, या घोषणांनी परिसर दुमदुमला होता. अचानक बाबासाहेबांचा धीरगंभीर आवाज आला.

उधाणलेला भीमसागर शांत झाला.‘ज्यांना माझ्याकरवी बौद्ध धम्माची दीक्षा घ्यायची आहे, त्यांनी हात जोडून उभे व्हावे.'' आपल्या लाडक्‍या नेत्यांच्या एका शब्दावर समोरचा पाच लाख अस्पृश्‍य समाज उभा झाला. एका सुरात ‘बुद्ध शरणम गच्छामि...'' हे बुद्धवंदनेचे स्वर आसमंतात निनादले. हजारो वर्षांच्या शृंखला याच पटांगणात गळून पडल्या ती आज दीक्षाभूमी बनली. जागतिक इतिहासात १४ ऑक्‍टोबर १९५६ या तारखेची नोंद झाली. या घटनेला आज ६६ वर्षे पूर्ण झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रुपाने १४ ऑक्टोबर १९५६ रोजी तथागत बुद्धाचा धम्म दीक्षाभूमीवर साकारला.

आजही धम्मदीक्षाच्या स्मृती डोळ्यात साठवून लाखोंचा भीमसागर या दीक्षाभूमीवर माथे टेकण्यासाठी येतो. दीक्षाभूमी ही शांतीदूतांच्या आणि क्रांतीसूर्याच्या ओठावरचे कारुण्य म्हणून उदयाला आली. यामुळे दीक्षाभूमीवरील धम्मदीक्षेच्या सोहळ्याचा नेत्रदीपक सोहळा दरवर्षी येथे होतो. १९५६ च्या १४ ऑक्टोबरचा तो क्षण आजही जसाच्या तसा धम्मदीक्षा सोहळ्याचा सुवर्ण इतिहास या पुस्तकात धम्मदीक्षा सोहळ्यातील अग्रणी नायक वामनराव गोडबोले यांनी लिहून ठेवला आहे.

बाबासाहेबांना हॉटेल श्‍याममध्ये निवासाची सोय करण्यापासून तर दीक्षा मंचापर्यंत पोचवण्यासाठी तयार केलेले गुप्त द्वार यांच्यांच्या गोडबोले यांच्यासह सोबतीला असलेल्या धम्मदीक्षा सोहळ्यातील वामनराव गोडबोले, सदानंद फुलझेले, दशरथ पाटील, आकांत माटे व इतर सहकाऱ्यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आले होते. बाबासाहेबांच्या एका हाकेला ‘ओ'' देऊन लाखोंचा जनसागर नागपुरात लोटला आला होता.

जिकडे बघावे तिकडे चिक्कार गर्दी होती. पाय ठेवायला जागा नव्हती. हातात पिशव्या. खांद्यावर लेकरू. डोक्‍यावर गाठोडे. गाठोड्यात कांदा, चटणी अन भाकरीची शिदोरी. आनंदनगरपासून तर धरमपेठसहीत सर्वच रस्त्यांवर बाईमाणसांचा पूर आला होता.तोच भीमसागराला शुक्रवारी (ता.१४) नागपुरात भरती येणार आहे. दीक्षाभूमीवर लाखो लोकं येतील. पुस्तकांचे स्टॉल लावण्यात येणार आहे. याशिवाय बुद्ध व भीमाच्या मुर्ती व इतर साहित्याचे स्टाल लागणार आहेत. सर्वाधिक स्टॉल पुस्तकांचे असतील.

रमापती प्रवेशद्वार

पुंडलिकराव मुल यांचे रमापती डेकोरेशनतर्फे दीक्षा मंच उभारण्याची व्यवस्था केली होती. ४० फूट लांब आणि २० फूट रुंद असा दीक्षा मंच तयार केला होता. स्टेजवर सांचीचा स्पुताची प्रतिकृती तयार केली होती. भगवान बुद्धाचे कटआऊट लावले होते. स्टेजवरची सजावट राम तिरपुडे यांनी केली होती. बाबासाहेबांना मोटारीतून रमापती गेटमधून नेण्यात येईल असे सांगण्यात आले होते. परंतु त्यावेळी बाबासाहेबांच्या जिवाला धोका होऊ नये म्हणून ऐनवेळी या प्रवेशद्वारातून न जाता लक्ष्मीनगर, बजाजनगरकडून नेण्यात आले होते. या आठवणींना या पुस्तकातून गोडबोले यांनी उजाळा दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपचे उमेदवार विनोद शेलार आघाडीवर

Vikhe Patil Won Shirdi Assembly Election 2024 final result live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कसबा विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे भाजपकडून असलेले उमेदवार हेमंत रासने यांची विजयाच्या दिशेने घौडदौड

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT