Nagpur teachers sakal
नागपूर

नागपूर : शिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई

सीईओंच्या सूचना : निवडणुकीसाठी रजेवर असलेल्यांना परत बोलवा

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - जिल्हा परिषदेच्या शिक्षकांशी संबंधित असलेल्या पतसंस्थेची निवडणूक होत आहे. अनेक शिक्षक रजा घेऊन प्रचारात गुंतले आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचे वृत्त ‘सकाळ’ ने प्रकाशित करताच शिक्षण विभाग खळबळून जागे झाले. मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) योगेश कुंभेजकर यांनी निवडणुकीसाठी रजेवर असलेल्या शिक्षकांना परत कामावर बोलण्याच्या सूचना केल्या. कामावर न परतनाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या दोन पतसंस्था आहे. यातील एका पतसंस्थेकरता दोन आठवड्यांनी निवडणूक होणार आहे. १७ पदासाठी ही निवडणूक होत असून यात ३ हजारांवर शिक्षक सदस्य आहेत. निवडणुकीत दोन पॅनल उभे आहेत. आपल्याच पॅनलमधील उमेदवार निवडून यावे, यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून जिवाचे रान करण्यात येत आहे. पतसंस्थेच्या निवडणुकीत ‘परिवर्तन’ करायचे असल्याने ‘आपले’ पॅनल निवडून आणा. त्यासाठी रजा घ्या, जोरात प्रचार करा, असा संदेशच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून पाठविण्यात येत आहे.

त्याला प्रतिसाद देत अनेक शिक्षकांनी रजा टाकून प्रचार सुरू केला आहे. वर्ग सुरू असतानाच शिक्षकांचे गट शाळेत येत असल्याने त्याचा अभ्यासवर परिणाम परिणाम होत आहे. २० तारखेला शिष्यवृत्तीची परीक्षा आहे. शिक्षक रजेवर असल्याने त्यावरही परिणाम होणार असल्याचे वृत्त ‘सकाळ’ने प्रकाशित केले. याची दखल सीईओ कुंभेजकर व शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार यांनी घेतली. रजेवर असलेल्या शिक्षकांची माहिती घेण्यात आली. आज सीईओ कुंभेजकर यांनी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. निवडणुकीसाठी रजेवर असलेल्यांना कामावर परत बोलाविण्याचे आदेश दिले.

जवळपास २७५ वर शिक्षकांनी रजा घेतली आहे. निवडणुकीसाठी रजा घेतलेल्यांची रजा रद्द करून त्यांना कामावर बोलाविण्यात येईल. कामावर न आल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात येईल.

-रोहिणी कुंभार, शिक्षणाधिकारी, प्राथमिक, जि.प.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT