नागपूर

Nagpur News : ड्रोनच्या स्वप्नांना बळ देणारे नागपूरचे ‘ड्रीम इनोव्हेटर’

हौशी विद्यार्थ्यांच्या उत्साहातून स्टार्टअपची निर्मिती; कोरोना काळातही काम

सम्राट कदम

नागपूर : केवळ हौस म्हणून ‘ड्रोन’ उडविण्यासाठी एकत्र आलेल्या विद्यार्थ्यांचा ग्रुप आता एका मोठ्या स्टार्टअपमध्ये परावर्तित झाला आहे. नागपूरच्या प्रियदर्शिनी, केडीके आणि यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्थापन केलेला ‘ड्रीम इनोव्हेटर’ नावाचा रोबोटिक्स क्लब ड्रोनशी निगडित सेवा आणि तंत्रज्ञानाचा व्यवसाय करत आहे.

मे २०१९ मध्ये प्रणव खेरगडे, अनिकेत देवरे, निहाल मानकर आणि ओंकार महाजन हे अभियांत्रिकीचे विद्यार्थी एकत्र आले आणि ड्रोन उडविण्याचे तंत्र शिकू लागले. आपल्या सारख्या इतर विद्यार्थ्यांनाही ‘ड्रोन’साठी तयार करायचे म्हणून क्लब स्थापन केला.

त्याची वार्षिक वर्गणी निश्चित केली आणि प्रशिक्षण वर्ग सुरू केले. एकीकडे ड्रोनची आवड जोपासण्यासाठी पैसे तर मिळाले, त्याचबरोबर नवे मित्रही तयार झाले. पण कोरोना आला आणि क्लबला एकत्र येणे बंद झाले. मात्र, विद्यार्थ्यांचे हे प्रयत्न वाया गेले नाही. ड्रोनशी निगडित अनेक सेवांसाठी त्यांना बोलावणे आले.

निहाल मानकर म्हणाला,की ‘आमच्या सोबत जोडलेल्या विद्यार्थ्यांना ड्रोन उडविण्याबरोबरच त्याचे तंत्रज्ञान, स्पर्धात्मक ज्ञान आणि कौशल्य विकासाचे उपक्रमही आम्ही राबवीत होतो. पण, कोरोना काळात सेवा क्षेत्रात काम करण्याची संधी आम्हाला मिळाली.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणसारख्या सरकारी संस्थांसोबत निरीक्षण आणि भू-मापनाची कामे मिळाली आणि आमचा छोटासा उद्योग सुरू झाला.’

‘सुरवातीला प्रियदर्शिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाने या स्टार्टअपला मदत केली. आता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मार्गदर्शनाने हे स्टार्टअप मोठे होत आहे. पाषाण टेक्नॉलॉजी नावाने विद्यार्थ्यांनी एका कंपनीची नोंदणी केली असून,

मध्य भारतात ड्रोनशी निगडित सेवा आणि विक्रीचे काम करत आहे. सध्या एकूण १५ विद्यार्थी स्टार्टअपमध्ये काम करत असून, त्यातील सात विद्यार्थ्यांनी नुकतेच पदवी शिक्षण पूर्ण केले आहे.

ड्रीम इनोव्हेटरचे उपक्रम

  • ड्रोनची आवड असलेल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण आणि मार्गदर्शन

  • खासगी ग्राहकांसाठी प्लॅनिंग, मॅपिंग, रस्ते विकास आदी क्षेत्रात सेवा

  • ड्रोन तंत्रज्ञानाच्या विविध सेवांपासून प्रत्यक्ष ड्रोन खरेदीसाठी सहाय्य

  • किफायतशीर ड्रोन निर्माणासाठी संशोधन आणि विकास कार्य

  • विद्यार्थ्यांना संशोधन प्रकल्पांसाठी साहाय्य आणि इंटर्नशिप

ड्रोनमध्ये काम करणारा गट विकसित करण्यावर आमचा भर आहे. तसेच, आम्ही जी कामे आजवर केली ती पुन्हा आमच्याकडे यावीत म्हणून प्रयत्न करत आहोत. जास्तीत जास्त लोकांना किफायतशीर दरात ड्रोनच्या सुविधा देणे, आमचे ध्येय आहे.

- निहाल मानकर, सदस्य, ड्रीम इनोव्हेटर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Latest Marathi News Updates live : लाडक्या बहिणींना आता महिन्याला 2100 रुपये मिळणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT