Nagpur Hit And Run eSakal
नागपूर

Nagpur Accident: नागपूरमध्ये फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना कारनं चिरडलं! दोघांचा मृत्यू, एक लहान मुलगा गंभीर जखमी

9 people sleeping on the pavement were crushed by a car in Nagpur; सुरुवातीला कारचालक तिथून पळून गेला पण पोलिसांनी माग काढत त्याला अखेर अटक केली.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नागपूर : पुण्यातील पोर्शे कार अपघाताचं प्रकरण ताजं असतानाच अनेक हिट अँड रनच्या घटना समोर आल्या आहेत. त्याच आज पुन्हा एक नवी घटना नागपूर इथं घडली आहे. यामध्ये मद्यधुंद अवस्थेतील कार चालकानं फुटपाथवर झोपलेल्या ९ जणांना चिरडलं आहे. यांपैकी दोन जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये एक महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. सुरुवातीला कारचालक तिथून पळून गेला पण पोलिसांनी माग काढत त्याला अखेर अटक केली. (Nagpur drunk driver case 9 people slept on the footpath crushed by a car)

सामच्या टीव्ही वृत्तानुसार, सोमवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास नागपुरातील देखोरी नाक्याजवळ ही घटना घडली. भूषण लांजेवार असं कार चालकाचं नाव असून तो इर्टिगा कार चालवत होता. त्याच्यासोबत इतरही काही तरुण असल्याची माहिती मिळते आहे. विशेष म्हणजे यातरुणांची कारमध्ये हुल्लडबाजी सुरु असल्याचीही माहिती मिळतेय. इथं फुटपाथच्या बाजुला छोट्या वस्तू विकून पोट भरणारे मजूर राहतात. फुटपाथच्या बाजुला त्यांच्या झोपड्या आहेत.

दरम्यान, मद्यधुंद कारचालकानं बेदारकपणे कार चालवली तेव्हा हे मजूर फुटपाथवर रांगेत झोपले होते. वेगात असलेली कार मजुरांच्या अंगावरुन गेल्यानं यामध्ये ७ जण गंभीर जखमी झालेत यामध्ये एका लहान मुलाचाही समावेश आहे. त्याचबरोबर कारचा वेग जास्त असल्यानं कारनं झोपडीलाही धडक दिली. यामध्ये ही पत्र्याची झोडपीली कोसळल्याचं चित्र आहे. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, सुरुवातीला पळून गेलेल्या कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BKC Metro Station: मोठी घटना! 40 फूट खोलवर लागली भयंकर आग, अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी

RBI: शक्तीकांता दास RBIचे गव्हर्नर राहणार की राजीनामा देणार? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

...तर त्यांना शिवतीर्थ कसा आशीर्वाद देणार? शिवाजी पार्कवरील मोदींच्या सभेवरून आदित्य ठाकरेंचं टीकास्त्र

Malegaon Crime : पोलिसांनी पकडला प्रतिबंधित गुटखा, ११ लाख ३९ हजार ५६० रुपयांचा माल जप्त

Farmer : भरपाईपासून ५० हजार शेतकरी वंचित,गतवर्षी रब्बी हंगामात झाले होते पिकांचे नुकसान

SCROLL FOR NEXT