Nagpur Traffic  sakal
नागपूर

Nagpur Traffic : महाकोंडीने नागपूरकरांच्या वेगाला ‘ब्रेक’...बजाजनगर, रामदासपेठ, धंतोलीचा मार्ग खडतर

Nagpur Traffic : बजाजनगर, धंतोली, रामदासपेठ येथे दररोजची वाहतूक कोंडी वाढत आहे. अपुरी रस्ते व्यवस्थापन आणि पार्किंग समस्यांमुळे नागपूरकरांचा संताप वाढत आहे.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : नगररचनेच्या बाबतीत राज्यातील इतर बड्या शहरांशी नागपूरची तुलना केल्यास येथे वाहतुकीसाठी पर्यायी रस्ते उपलब्ध आहेत. एका मार्गावर विकासकामे किंवा वाहतूक कोंडी व इतर समस्या असल्यास पर्याय उपलब्ध आहेत.

त्यामुळे, वाहनचालक मार्गात बदल करू शकतो. उच्चभ्रू नागरिकांचा परिसर असलेल्या बजाजनगर, धंतोली आणि रामदासपेठच्या काही भागात वाहतूक कोंडी ही दररोजची समस्या झाली आहे. यामुळे सिग्नलवर लांबच्या लांब रांगा पाहताना पुण्या-मुंबईचा फिल येतो.

मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करीत असलेल्या बजाजनगर परिसरामध्ये स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या नावाने व्हीएनआयटी प्रवेशद्वार ते बजाजनगर चौक मार्गावर नव्या फुटपाथची भर पडत आहे. भविष्याचा विचार करता हे फुटपाथ डिझाईन केले आहेत. परंतु, नियोजन करताना भविष्यातील रहदारी वाढीबाबतचे विचार करायला हवा होता, हा प्रश्‍न प्रशासनाला पडला नाही याचेच आश्‍चर्य वाटते.

अर्धा रस्ता फुटपाथमध्ये गेल्यावर वाहने पार्क करण्यात काही जागा व्यापली जाते. यामुळे, वाहतुकीसाठी अगदी तोकडा रस्ता शिल्लक राहणार आहे. यामुळे येथील वाहतूक वळवावी लागेल किंवा पार्किंगसाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी लागणार आहे. वाढत्या रहदारीबाबत नियोजन करण्याचा अंतर्भाव स्मार्टसिटीमध्ये होत नाही काय? असा प्रश्‍न जनसामान्यांना पडला आहे.

फुटपाथवरील विक्रेत्यांचे ग्राहक अडवतात रस्ता

व्हीएनआयटी ते काचीपुरा चौक या मार्गावर हे नवे फुटपाथ तयार होत आहेत. त्या परिसरामध्ये खाद्य पदार्थ विक्रेते, हॉटेल्सची संख्या मोठी आहे. त्यामुळे, समाजकंटकांचा वावर मोठ्या प्रमाणात दिसून येतो. ग्राहकांची वाहने रस्त्यावर ठेवली जातात. यामुळे रस्ते निमुळते होतात. हा प्रकार वाहतूक कोंडीचे प्रमुख कारण आहे. पण याकडे लक्ष द्यायला वाहतूक पोलिस व प्रशासनाकडे वेळ नाही. या दुकानांमुळे रस्त्यावर करण्यात येणारी पार्किंग वाहतुकीला अडथळा ठरत आहे.

बस, ट्रव्‍हल्समुळे होतो अडथळा

धंतोली, रामदासपेठ या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दवाखान्यांची संख्या आहे. त्यामुळे, परराज्यासह विदर्भातील अनेकांची वाहने या परिसरात पार्क केलेली असतात. तसेच, अमरावती मार्ग, हिंगणा मार्गाकडे जाण्या-येणाऱ्या एसटी व खासगी बसेसचा मार्ग देखील याच परिसरातून जातो. ऐन वर्दळीच्या वेळी या बसगाड्यांमुळे रस्त्यावर गर्दी होत असल्याने वाहतूक कोंडीत मोठी भर पडते. त्यामुळे, वाहनांच्या लांबच्या लांब रांगा दिसतात.

वाहतूक कोंडीची ठिकाणे

  • बजाजनगर : व्हीएनआयटी प्रवेशद्वार ते बजाजनगर चौक, शंकरनगर चौक ते लक्ष्मीनगर चौक

  • धंतोली : धंतोली पोलिस स्टेशन मार्ग, मेहाडीया चौक, यशवंत स्टेडीयम, धंतोली गार्डन

  • रामदासपेठ : कॅनल रोड, अलंकार टॉकीज रोड ते काछीपुरा मार्ग

चालानकडे लक्ष, ट्राफिक जामचा प्रश्‍न वाऱ्यावर

आठ रस्ता चौक ते शंकरनगर चौकापर्यंतच्या रस्त्यावर सकाळी आणि सायंकाळी अशी आठ तास वाहतूक कोंडी होते. दोन कोपऱ्यावर दोन वाहतूक पोलिस तैनात असतात. मात्र, दुचाकीस्वारांमध्ये हेल्मेट व चारचाकी वाहनचालकांमध्ये सीट बेल्टसाठी चालान कारवाईचा धाक वगळता वाहतुकीच्या नियमनाच्या दृष्टीने पोलिसांचा धाक दिसत नाही.

वाहतुकीच्या नियमांचे पोलिसांच्या डोळ्या देखत उल्लंघन होत असून वाहतूक पोलिसांचा भर मात्र केवळ चालान कारवाईवर आहे. यामुळे वाहतूक कोंडीवर उपाय शोधताना प्रशासन आणि वाहतूक पोलिस दिसत नाही. यामुळे दाद कुणाकडे मागावी असा मुख्य प्रश्‍न आहे.

कोंडीची कथा पाठवा व्‍यथा

शहरात अनेक रस्त्यांवर वाहतूक कोंडीचा त्रास होत आहे. तुमच्या भागातही अशी स्थिती असेल तर प्रशासनाला जागे करण्यासाठी ‘सकाळ’च्या या मोहिमेत सहभागी व्हा. यासाठी आम्हाला 9307049529 या क्रमांकावर या वृत्त मालिकेसंदर्भात प्रतिक्रिया, छायाचित्रे पाठवा. आम्ही ती प्रकाशित करू.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT