बळीराजा संकटात, मात्र नेते निवडणुकीत sakal
नागपूर

नागपूर : बळीराजा संकटात, मात्र नेते निवडणुकीत

शेतकरी हिताच्या गोष्टी करणारे नेते निवडणुकीत व्यस्त असल्याने शेतकऱ्यांचा वाली कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मनोज खुटाटे

जलालखेडा (जि. नागपूर) : सततच्या पावसामुळे शेतकरी चांगलाच संकटात सापडला आहे. कपाशी, सोयाबीनपाठोपाठ फळपिकांवर संक्रांत आल्याने शेतकऱ्यांनी जगायचे कसे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. मागील वर्षीची नुकसानभरपाई अद्याप मिळालेली नाही. अशातच पुन्हा नवीन संकटामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. शेतकरी हिताच्या गोष्टी करणारे नेते निवडणुकीत व्यस्त असल्याने शेतकऱ्यांचा वाली कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हंगामाच्या सुरुवातीला पावसाअभावी खोडकिड्यामुळे पीक नष्ट झाले. त्यानंतर सततच्या पावसामुळे संत्रा व मोसंबीवर ‘बॉऊन रॉट’ आला. त्यामुळे संत्रा व मोसंबीची मोठ्या प्रमाणात गळती झाली. त्याचबरोबर संत्र्यावर मोठ्या प्रमाणात कोळशी असल्याने नुकसान झाले. काही भागात कपाशीवर मर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. तसेच सोयाबीनचे शंभर टक्के नुकसान झाले. त्यामुळे जगाचा पोशिंदा चिंतित आहे. नरखेड तालुक्यात २४ हजार हेक्टरमध्ये कपाशीचे पीक आहे. तर दहा हजार हेक्टरमध्ये सोयाबीनचे पीक आहे. संत्रा व मोसंबीनंतर सर्वाधिक क्षेत्रात कपाशीची लागवड केली जाते. सततच्या रोगाने शेतकऱ्यांनी जगायचे कसे, असा प्रश्न निर्माण केला आहे.

परंतु राजकारणी लोक येत्या पाच आॅक्टोबर रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत व्यस्त आहेत. रिंगणात उतरलेल्या उमेदवारांच्या प्रचाराला जोर चढल्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला कुणाकडे वेळ नसल्याचे दिसून येते.

ओला दुष्काळ जाहीर करा

आधी सोयाबीनवर खोडकिडा, संत्रा-मोसंबीवर बॉऊन रॉट व कोळशी तर कपाशीवर बोंडअळी, मररोगाचा प्रादूर्भाव झाला. पावसाने नदीला आलेल्या पुरात पिके वाहून गेली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याबाबत मुख्यमंत्री व कृषिमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची विनंती केली. -राजेंद्र हरणे, जिल्हा प्रमुख, शिवसेना, नागपूर (ग्रामीण )

सरकारचे शेतकऱ्यांकडे मुळीच लक्ष नाही. नरखेड तालुक्यात आधी सोयाबीनवर खोडकिडीने नुकसान केले. संत्रा-मोसंबीची मोठ्या प्रमाणात फळगळती सुरू आहे. कपाशीवर बोंडअळी, पिंगटपणा व मररोगाचा प्रादूर्भाव आहे. सरकारमधील मंत्री, खासदार व या भागाचे आमदार शेतकऱ्यांच्या बांधावर आले नाही. तत्काळ मदत मिळाली नाही तर भाजप सरकारविरोधात आंदोलन करू.

- उकेश चव्हाण, उपाध्यक्ष भाजपा नागपूर जिल्हा(ग्रामीण)

नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, सततच्या पावसामुळे सोयाबीन, कापूस व संत्रा-मोसंबी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सततच्या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. तर विमा कंपनी प्रीमियम रकमेत वाढ करीत असल्याने शेतकऱ्यांवर भुर्दंड बसतो. मात्र शासनकर्त्यांचे यावर मौन आहे. तत्काळ निर्णय घ्यावा.

- वसंत चांडक, माजी सभापती, नरखेड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पूर्व विधानसभेत वरुण सरदेसाईंची मुसंडी

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT