नागपूर

Nagpur Accident: लेव्हलिंग मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा मृत्यू, ग्रेडर मशीनने २० फूट फरफटत नेले

सोनेगाव-बेला रस्त्याचे सिमेंट काँक्रिटचे काम सुरू आहे. या कामावरील लेव्हलिंग मशिनने दहेली येथील शेतकऱ्याला मुरूम पसरवणाऱ्या ग्रेडर मशिनने वीस फूट फरकटत नेले.

सकाळ डिजिटल टीम

Nagpur Bela Leveling Machine Accident: सोनेगाव-बेला रस्त्याचे सिमेंट काँक्रिटचे काम सुरू आहे. या कामावरील लेव्हलिंग मशिनने दहेली येथील शेतकऱ्याला मुरूम पसरवणाऱ्या ग्रेडर मशिनने वीस फूट फरकटत नेले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. भाऊराव पांडुरंग आंबुलकर (वय ७०) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

भाऊराव हे बुधवारी (ता.१७) शेताकडे जात असताना एमएच-३१-एफई ३३८५ या क्रमांकाच्या मशिनने भाऊराव यांना २० फुट फरफटत नेले. त्यांच्याकडे तीन एकर शेती आहे. त्यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे. रस्त्याचे काम अभी कंट्रक्शन कंपनी करीत आहे.

एकाच वेळी दोन्ही बाजूने खोदकाम व मुरूम टाकण्याचे काम सुरू असल्यामुळे लहान मोठ्या वाहनांना वाहतूक करणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे दररोज अपघाताच्या किरकोळ घटना घडत आहेत. अपघाताचे वृत्त समजताच दहेली येथील संतप्त नागरिक घटनास्थळी गोळा झाले होते. परंतु पोलिसांनी संयमाने परिस्थिती हाताळली. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

Trending News : काॅंग्रेसचे दोन गट भररस्त्यात भिडले, तितक्यात अॅम्बुलन्स आली अन् पुढे जे घडलं...

Mayawati : 'बसप' इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक का लढवत नाही? मायावतींनी सांगितले 'हे' कारण

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

SCROLL FOR NEXT