Nagpur Five fraud case filed against four people esakal
नागपूर

नागपूर : आणखी पाच तरुणांकडून फसवणुकीची तक्रार

अमरावतीसह शहरातील चार युवकांचा समावेश

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : रेल्वे व एसबीआयमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून युवकांना तब्बल दीड कोटीने गंडा घालणाऱ्या टोळीचा ग्रामीण पोलिस आर्थिक विभागाच्या पथकाने पर्दाफाश केला. यात तिघांना अटक केली. सुरुवातीला बारा युवकांची तक्रार असताना पोलिसांच्या आवाहनानंतर आणखी पाच तरुणांनी ग्रामीण पोलिसांकडे तक्रार नोंदविली. त्यामध्ये अमरावतीसह नागपूररातील पाच युवकांचा समावेश आहे.

शिल्पा पालपार्थी हिच्यासह कुंदनकुमार ऊर्फ राहुलसिंग रमेश शर्मा (वय ३४) व मोहम्मद दानिश जिशान आलम ऊर्फ दानिश जिशान मोहम्मद आलमगिर (वय ३५, दोन्ही रा. पाटणा, बिहार) या दोघांना हाताशी धरून अमित मारोती कोवे आणि नरेश नत्थूजी कामोने या दोघांच्या मदतीने १२ बेरोजगार युवकांना वेकोली, रेल्वे व एसबीआयमध्ये नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे घेतल्याची माहिती समोर आली होती.

त्यामध्ये जानेवारी महिन्यात केळवद पोलिस स्टेशनमध्ये शिल्पा, कोवे त्याच्या साथीदारांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर कोवे याने पंचशील चौकात विष प्राशन करून आत्महत्या केली. त्याच्या सुसाईड नोट आणि व्हॉट्सॲप संदेशावरुन घटनेचा टोळीचा खुलासा झाला. प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हेशाखेचे प्रभारी उपअधीक्षक आर.डी. निकम यांच्याकडे सोपविला. पोलिसांनी शिल्पाला अटक केली. तिची दहा दिवस पोलिस कोठडी घेतली. याशिवाय तिच्या बंगल्याची झडती घेतली. तेव्हा शिल्पा व तिच्या साथीदारांनी ज्याची फसवणूक केली, त्यांनी समोर येण्याचे आवाहन केले. पाच युवकांनी तक्रारी केल्या आहेत. त्यानुसार पोलिस त्यांची साक्ष नोंदवित आहे अशी माहिती आहे.

तक्रारी असलेल्या ठिकाणीच तपास

ग्रामीण भागातील ९ युवकांना तर शहरातील ३ युवकांना नोकरी देण्याच्या नावावर शिल्पा पालपार्थी हिच्या टोळीने गंडविले. याशिवाय अमरावती, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या भागातही तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. आता पाच आणखी तक्रारी आल्याने तिच्या विरोधात ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीतून तक्रार आली आहे, तेथील ठाण्यातूनच प्रकरणाचा तपास देण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शरद कोण आघाडीवर?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

Shiv Sena Shinde Vs Thackeray: गद्दारीचा आरोप झालेल्या शिंदे सेनेला मतदारांची साथ! ठाकरेंची सेना पिछाडीवर; जाणून घ्या आकडेवारी

SCROLL FOR NEXT