nagpur sakal
नागपूर

Nagpur Flood : पावसात अडकलोय बेटा, लवकरच घरी येतो ; सुरक्षारक्षकाचे ‘ते’ शब्द ठरले अखेरचे

पावसाच्या तडाख्याने शहरातील अनेक कुटुंबांची वाताहात झाली

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - शनिवारी पहाटे पुरामध्ये सुरक्षारक्षक बाबूजी पंढरीनाथ उमरेडकर वाहून गेले. मृत्यूपूर्वी त्यांनी आपल्या पंचवीस वर्षीय मुलीशी फोनवर बोलून ‘पावसात अडकलोय बेटा, लवकरच घरी येतो’ असे सांगितले. मात्र, नियतीला काही वेगळेच मान्य असल्याने मुलीला वडिलांचा मृतदेहच बघायला मिळाला.

पावसाच्या तडाख्याने शहरातील अनेक कुटुंबांची वाताहात झाली. तब्बल पाच जणांना जीव गमवावा लागला. यातील सुरक्षारक्षक बाबूजी उमरेडकर (वय ६५, रा. अष्टविनायकनगर) यांचा मृत्यू मनाला चटका लावून गेला. उमरेडकर हे डॉ. संचेती यांच्या रुग्णालयात सुरक्षारक्षक होते.

शुक्रवारी रात्री उशिरा पाऊस कोसळत असताना ड्युटी संपवून घरी निघालेल्या एका अनोळखी व्यक्तीचा पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला. शनिवारी पंचशील चौकाजवळील पुलाच्या कोसळलेल्या भागात त्यांचा मृतदेह सापडला.

विशेष म्हणजे, पुरात अडकले असताना त्यांनी मुलगी राधिका हिला फोन केला. यावेळी तिला पावसात अडकलो असून, कमी होताच घरी येतो असे सांगितले. मात्र, बराच उशीर झाल्यावरही बाबा घरी न परतल्याने कुटुंबियांनी अंबाझरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे ते सायकलसह पाण्यात वाहून गेले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. मृतदेह वाहून पंचशील पुलाच्या कोसळलेल्या भागात अडकला. शनिवारी त्यांचा मृतदेह अडकल्याचे दुपारी उघडकीस आले. सुमारे चार तासांनंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेहाची ओळख पटली. कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. वडील घरी येतील या आशेने त्यांची वाट बघणाऱ्या मुलीची आशा भाबडी ठरली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT