mumbai flood 26 july  sakal
नागपूर

Nagpur Floods: नागपुरकरांवर कोपला वरुणराजा अन् मुंबईकरांना आठवला २६ जुलैचा पाऊस!

Chinmay Jagtap

Nagpur Floods: नागपूर मध्ये 22 सप्टेंबरच्या रात्री जोरदार पाऊस झाला. संपूर्ण नागपूर शहर पुराखाली अडकलं. हा पाऊस इतका भयावह होता की कित्येक गुरं यावेळी वाहुन गेली. कित्येक नागरिकांच्या गाड्या वाहून गेल्या. कित्येकांच्या घरात पाणी शिरलं. एका रात्रीत कित्येकांचं होत्याचं नव्हतं झालं. मात्र नागपूरमध्ये आलेल्या या पावसामुळे मुंबईकरांना आली 26 जुलै रोजी झालेल्या पावसाची आठवण . तर नक्की 26 जुलैला मुंबईमध्ये काय झालं होतं? मुंबईकर त्या दिवसाला आजही का बरं विसरू शकत नाहीत?

देशाची आर्थिक राजधानी, महाराष्ट्राची राजधानी आणि कित्येकांसाठी स्वप्नांच शहर असलेल्या मुंबईने आजवर कित्येक आघात सोसले आहेत. दहशतवादी हल्ले, बॉम्बस्फोट, अपघात मात्र ही मुंबई कधीही थांबली नाही. मात्र पावसाने ती थांबवून दाखवली होती. 26 जुलै 2005ला पावसामुळे मुंबई थांबली होती.

26 जुलैला मुंबईवर धोधो पाऊस कोसळला. पावसाने धुमाकूळ घातला. पाणी तुंबलं रेल्वे बंद झाली. रस्ते वाहतूक ठप्प झाली. मुंबईकरांना काय करावं? हे त्यावेळेस समजतच नव्हतं. एवढा पूर येईल आणि हाहा:कार उडेल अशी कुणालाच कल्पना नव्हती.

26जुलैच्या पावसात 4000 टॅक्सी, 900 बेस्ट बसेस. 37 हजार रिक्षा इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकांचं नुकसान झालं होतं. जवळजवळ 14000 घरं उद्धस्त झाली होती. केवळ 24 तासात 944 मीटर पाऊस पडला होता.

कित्येक मुंबईकरांची परिचित व्यक्ती पावसामध्ये हरवली. नंतर ती कुठे गेली? हे लोकांना समजलं नाही. कित्येकांचे नातलग,मित्र, घरची माणसं वाहून गेली.

26 जुलै आणि 27 जुलै असे दोन दिवस मुंबईमध्ये मुसळधार पाऊस झाला. ढगफुटी झाली. मुंबईसह ठाणे आणि इतर परिसरामध्ये पाऊस धो धो कोसळला. रस्त्यांवर पाणी साचलं. वाहतुकीचा खोळंबा झाला. तीनही रेल्वे मार्ग बंद झाली आणि त्यावेळी मुंबईकर ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणीच अडकून पडले.

26 जुलैला दुपारी एक वाजेच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. तो 27 जुलै सकाळी साडेआठ वाजेपर्यंत मुसळधार सुरूच होता. या पावसामध्ये लाखो लोक बेघर झाले. हजार हून अधिक लोक मृत्युमुखी पडले.

त्या काळात फार कमी प्रमाणावर लोकांकडे मोबाईल होते. यामुळे घरातून बाहेर पडलेली मंडळी नक्की कुठे आहेत? याची चिंता मुंबईतील त्यांच्या घरच्यांना लागली होती. जिथून कुठून सोय होईल त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न होत होता. काहींचा झाला तर काहींचा झाला नाही आणि तो अजूनही होऊ शकलेला नाही.

त्या भयावह अनुभवाची आठवण मुंबईकरांना कुठेही पाऊस पडो होतेच. कोणत्याही ठिकाणी पाऊस पडतो तेव्हा येते मुंबई आणि परिसरामध्ये राहणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला विचारा की तुमचा 26 जुलै रोजीचा अनुभव कसा होता? अजूनही कित्येकांचे डोळे त्या आठवणीमुळे पाणवतात किंवा कित्येक जण एकटक बघत शांत बसतात. त्या दिवसाची भीती आजही मुंबईकरांच्या मनात आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Elections: 'एम' फॅक्टरचा कौल MVAच्या बाजूने, सर्वात मोठ्या संघटनेच्या पाठिंब्यानं बळ वाढलं, महायुतीला टेन्शन

Mohammad Shami ने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी ठोकली दावेदारी; गोलंदाजीनंतर फलंदाजीतही दाखवली चमक

Goa Tourism : जाऊ फुलपाखरांच्या गावा! गोव्यात बटरफ्लाय कंझर्व्हेटरीला नक्की भेट द्या, फि,वेळ आणि ठिकाण जाणून घ्या सर्वकाही

Vinod Tawde : अजित पवारांना सोबत घेतल्याचे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी स्पष्टच सांगितले कारण...

Vinod Tawde: पुन्हा शरद पवार पावसात भिजले; भाजपचे तावडे म्हणाले, हा जिंकण्याचा 'भ्रम'...

SCROLL FOR NEXT