नागपूरमध्ये मुसळधार पावसामुळं पूरस्थिती निर्माण झाली असून NDRF आणि SDRF च्या तुकड्या मदतीसाठी दाखल झाल्या आहेत. पुराचा सर्वाधिक फटका अंबाझरी भागात बसला असून इथं एका महिलेचा मृत्यू झाली आहे. यापार्श्वभूमीवर बचावासाठी लष्कराच्या दोन तुकड्या दाखल झाल्या आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील इथल्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. (Nagpur Floods One woman dies in Ambazari due to floods two units of army deployed for rescue)
फडणवीसांनी नागपूरमधील पूरस्थितीबाबत सविस्तर माहिती देणारं ट्विट केलं आहे. त्यानुसार, SDRFच्या 2 तुकड्या 7 गटांत विभागण्यात आल्या असून सखल भागातील नागरिकांना बाहेर काढले जात आहे. NDRF आणि SDRF या पथकांनी आत्तापर्यंत 140 नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेर काढलं आहे.
मूक-बधीर विद्यालयातील 40 विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे. नागपूर शहराच्या विविध भागात 2 NDRFच्या टीम युद्धपातळीवर बचावकार्यात आहेत. त्याचबरोबर अग्निशमन दल सुद्धा मदत कार्यात आहे.
अंबाझरी परिसरात लष्कराच्या 2 तुकड्या पोहोचत आहेत. शाळा आणि महाविद्यालयांना आज सुटी जाहीर करण्यात आली आहे. गरज नसेल त्यांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन स्थानिक प्रशासनानं केलं आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि घाबरून जाऊ नका, असं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. वृद्ध नागरिकांना सर्व ती मदत तातडीनं देण्याचे निर्देशही फडणवीसांनी दिले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.