Nagpur Fraud Crime sakal
नागपूर

Nagpur Fraud Crime : गुंतवणुकदारांची कोट्यवधीची फसवणूक ; तीन संचालकांना अटक,पोलिसांकडे तक्रारी येण्याचा ओघ सुरुच

इको रेंज ग्रीन एनर्जी सोल्युशन प्रा. लिमिटेड ब्राह्मणी कंपनीच्या नावावर गुंतवणुकदारांना महिन्याला तीन ते पाच टक्के लाभांश देण्याचे आमिष दाखवून गुंतवणुकदारांची कोट्यवधींची फसवणूक केल्याचा प्रकार कळमेश्वर पोलिस स्टेशन हद्दीतील ब्राह्मणी येथे उघडकीस आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

कळमेश्वर : इको रेंज ग्रीन एनर्जी सोल्युशन प्रा. लिमिटेड ब्राह्मणी कंपनीच्या नावावर गुंतवणुकदारांना महिन्याला तीन ते पाच टक्के लाभांश देण्याचे आमिष दाखवून गुंतवणुकदारांची कोट्यवधींची फसवणूक केल्याचा प्रकार कळमेश्वर पोलिस स्टेशन हद्दीतील ब्राह्मणी येथे उघडकीस आला आहे.

याप्रकरणी इको रेंज ग्रीन एनर्जी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड फर्मचे संचालक ईश्वर शेषराव भलावी, शैलेश शंकरराव चौधरी, तसेच सोबत काम करणारा सचिन यावलकर या तिघांविरुद्ध कळमेश्वर पोलिस स्टेशनमध्ये फिर्यादीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाल्यानंतर तिघांनाही अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी आतापर्यंत दोनशेपेक्षा अधिक फिर्यादींनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. आरोपींना अटक झाल्याने तक्रारींचा ओघ सतत वाढत आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ब्राह्मणी येथील इको रेंज ग्रीन एनर्जी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड येथे एजंट म्हणून काम करतो, अशी बतावणी करून कंपनीला उसणे स्वरूपात पैशांची गरज भासवून पैशांची गुंतवणूक करा, त्याचा तुम्हाला चांगला लाभांश व व्याज मिळेल, अशी विश्वासार्ह माहिती देऊन कंपनीचे संचालक आरोपी ईश्वर शेषराव भलावी, शैलेश शंकरराव चौधरी व सोबत काम करणारा सचिन यावलकर यांनी गुंतवणूकदारांना पाच टक्के तसेच तीन टक्के प्रति महिना लाभांश देण्याचे आमिष दाखविले.

गुंतवणुकदारांना काही दिवस प्रति महिना लाभांश देऊन त्यानंतर लाभांश व मुद्दल काहीही परत न करता ७५ लाख १० हजार रुपयांची एकूण नऊ गुंतवकदारांची फसवणूक केल्याचे फिर्यादी नितेश पंढरी तकीत यांच्या तक्रारीवरून कळमेश्वर पोलिस स्टेशन येथे भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून तीनही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

आरोपींकडे विचारपूस केली असता त्यांनी २०० च्या वर गुंतवणूकदारांची जवळपास दहा कोटी रुपयांपेक्षा रक्कम जमा करून ती रक्कम कंपनीमध्ये न वापरता वैयक्तिक कामाकरिता वापरल्याचे व गुंतवणूकदारांची फसवणूक केली असल्याचे पोलिसांना दिसून आले. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलिस अधीक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी सावनेर अनिल म्हस्के करीत आहेत.

तक्रारीसाठी पुढे येण्याचे पोलिस विभागाचे आवाहन

कंपनीच्या तिघाही संचालकांना अटक झाल्यापासून दररोज तक्रारींचा ओघ पोलिस ठाण्याकडे येत आहे.आतापर्यंत २०० पेक्षा अधिक तक्रारी पोलिसांकडे प्राप्त झाल्या. जवळपास साडेतीन कोटी रुपयांची फसवणूक आरोपींनी केली असून हा आकडा पंधरा कोटीच्या घरात असल्याची विश्वसनीय माहिती आहे. इको रेंज ग्रीन एनर्जी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत गुंतवणूक करा, म्हणून आरोपींनी जर अजून कुणाची फसवणूक केली असल्यास त्यांनी कळमेश्वर येथील पोलिस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT