Nagpur Oxygen leak stopped 
नागपूर

नागपूर : मेयोत थांबली ऑक्सिजन गळती

१२ लिकेजचा शोध, विद्युत प्रवाहाच्या गळतीवर नजर

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोना काळात ऑक्सिजन तुटवडा होता. यावेळी ऑक्सिजन प्लान्टमधून मोठ्या प्रमाणात गळती सुरू होती. ऑक्सिजनचा अपव्यय टाळण्यासाठी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) ऑक्सिजन लिकेज शोधणारे यंत्र लावण्यात आले. विशेष असे की, तीन आठवड्यात ‘ऑक्सिजन पाइपलाइन’ मधून १२ ठिकाणाहून होत असलेली गळती शोधून काढली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात राज्यात हा पहिलाच प्रकल्प यशस्वी झाला आहे.

मेयोतील बधिरीकरण विभागप्रमुख डॉ. वैशाली शेलगावकर यांच्या मार्गदर्शनात ऑक्सिजन गळती रोखणारा प्रकल्प तयार झाला. जिल्हाधिकारी आर. विमला यांनी यासाठी मोलाची मदत केली. जिल्हा नियोजन समितीकडून प्राप्त झालेल्या १६ लाख ७७ हजार रुपयांच्या विशेष निधीतून हा प्रकल्प झाला. डॉ. शेलगावकर यांनी हा प्रस्ताव सादर केल्यानंतर ७ लाख ७५ हजार रुपयाचे सेंसर आणि गळतीचा अहवाल सांगणारे ९ लाख २२ हजाराचा निधी मंजूर झाला. तत्काळ जर्मनीतील कंपनीकडून यंत्र मागवण्यात आले.

प्रायोगिक स्तरावर गळती शोधण्याचे काम सुरु झाले. यंत्र कार्यान्वित झाल्यानंतर मागील तीन आठवड्यात १२ ठिकाणी ऑक्सिजनची गळती होत असल्याचे यंत्राद्वारे निदर्शनास आले. बधिरीकरण विभागाच्या निर्देशानुसार ही गळती रोखण्यात यश आले. मेयोतील ६ कर्मचाऱ्यांना हे यंत्र चालविण्याचे प्रशिक्षण कंपनीद्वारे दिले.

कॅमेऱ्याच्या माध्यमातून गळतीचा शोध

दोनपैकी एक यंत्र ऑक्सिजन पुरवठ्याच्या मुख्य व्हॉल्व्हमधून वॉर्डात पुरवठा होणाऱ्या पाइपलाइनमध्ये फिरवता येते. यंत्रातील कॅमेराद्वारे गळती शोधता येते. मोबाईलच्या कॅमेऱ्याप्रमाणे हे यंत्र काम करते. ऑक्सिजन गळती आढळताच, अल्ट्रासॉनिक किरणं यंत्राच्या स्क्रीनवर परावर्तित होतात. त्याचवेळी एक विशिष्ट प्रकारचा आवाज होतो. दुसऱ्या यंत्रावर किती दिवसांपासून गळती सुरू आहे, किती ऑक्सिजनचा अपव्यय झाला, याची माहिती मिळते.

दुहेरी लाभ घेता येईल?

या यंत्राद्वारे विद्युत प्रवाहाच्या गळतीबाबतही माहिती मिळवता येते. विद्युत गळतीमुळे होणारी अनुचित घटनेचे अलर्ट यंत्राद्वारे मिळू शकतात. याच उद्देशातून सार्वजनिक बांधकाम विभागातील ८ कर्मचाऱ्यांना कंपनीच्या अग्निसुरक्षा विभागातील तज्ज्ञांनी प्रशिक्षण दिले आहे. कंपनीकडून २ वर्षांची यंत्राबाबत वॉरंटी दिली आहे. पुढील ८ वर्षे देखभाल दुरुस्ती कंपनीद्वारे करण्यात येईल. विशेष असे की, मेयोच्या विविध वॉर्डांमध्ये वेळापत्रकानुसार या यंत्राद्वारे विद्युत तसेच ऑक्सिजन गळती शोधण्यासाठी फिरवली जाणार आहे.

कोरोनाकाळातील अनुभव पाहता ऑक्सिजनचा वापर जपून करण्यासोबतच गळती होऊ नये या हेतूने हे यंत्र खरेदी केले. गळतीमुळे होणारा ऑक्सिजनचा अपव्यय थांबवण्यात यश आले. जिल्हाधिकारी आर. विमला यांच्या मदतीतून हा प्रकल्प साकारला. यंत्र कार्यान्वित झाले असून ऑक्सिजन गळतीची तत्काळ माहिती मिळते.

- डॉ. वैशाली शेलगावकर, विभाग प्रमुख, बधिरीकरण विभाग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahavikas Aghadi advertisement: महाविकास आघाडीच्या जाहिरातीवर ब्राम्हण समाजाचा तीव्र आक्षेप; बंदी आणण्याची मागणी

'बिग बॉस १८' मध्ये सलमानने घेतली अश्नीर ग्रोवरची शाळा; दोगलापन वाल्या डायलॉगवर भाईजान नाराज

Rahul Gandhi : शेतकरी हितासाठी ‘मविआ’ कटिबद्ध...राहुल गांधी : सोयाबीनला सात हजार रुपये भाव देऊ

Nepal Tourist Places: नेपाळमधील 'ही' पाच ठिकाणे आहेत नयनरम्य, अनेक पर्यटकांनाही नसेल माहिती

Google Spam Detection Tool : ट्रूकॉलरला टक्कर द्यायला गुगलने आणलं नवं फीचर, तुमच्या फोनमध्ये कसं वापराल? वाचा

SCROLL FOR NEXT