Halba Community  Esakal
नागपूर

Halba Community: हलबा समाजामध्ये सत्ताधाऱ्यांविरोधात असंतोष, निवडणुकीत धडा शिकवण्याचा कृती समितीचा इशारा

सकाळ डिजिटल टीम

Nagpur Halba Community: हलबा समाजाच्या आरक्षणासंदर्भात कुठलीची दुरुस्ती केली जात नसल्याने यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात समाजामध्ये मोठा असंतोष निर्माण झाला असून भाजपला धडा शिकवण्याचा इशारा आदिम कृती समितीच्यावतीने देण्यात आला.

सी. पी. ॲँड बेरार येथे वास्तव्य करणारे हलबा (विणकर) हे अनुसूचित जमातीचे आहेत. विणकर व्यवसायामुळे त्यांची जमात कोष्टी- हलबाकोष्टी अशी नोंदविण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कोष्टी हा व्यवसाय असून हलबा ही जमात आहे असा स्पष्ट निकाल दिला आहे.

परंतु त्याबाबत अद्यापही कोणतीच संविधान दुरुस्ती करण्यात आलेली नसल्याने समाजाचे आरक्षण धोक्यात आले आहे. हा समाजावर अन्याय आहे. ही समस्या सोडविण्यासाठी १० वर्षापासून संविधान दुरुस्तीची मागणी राष्ट्रीय आदिम कृती समिती कडून केंद्र शासनाकडे केली जात आहे. परंतु केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजाची समस्या आतापर्यंत सोडवली नसल्याने हलबा समाजामध्येत रोष असल्याचे विश्वनाथ आंसई यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. (Latest Marathi News)

महाराष्ट्र शासनाने हलबांची थट्टा करण्याचे ठरविले असेल तर विश्वासघाताला माफी नाही व हलबा समाज या निवडणुकीमध्ये भाजपला त्यांची जागा दाखवेल, असा निर्णय हलबा चिंतन मेळाव्यात समाजाने घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला चंद्रभान पराते, प्रकाश निमजे, राजू नंदनवार, धनराज पखाले, मनोहर घोराडकर, ओमप्रकाश पाठराबे, भास्कर चिचघरे, वासुदेव वाकोडीकर, ओमप्रकाश शाहीर, पी.एम. रामटेकर व डॉ विजय सुख आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dasara Melava Rally: प्रचार तोफांची आज पहिली सलामी; जाणून घ्या कोणत्या नेत्याचा कुठं होणार दसरा मेळावा

Bagmati Express Accident: मोठा रेल्वे अपघात! वेग 75 किमी, बागमती एक्स्प्रेस मुख्य मार्गाऐवजी लूप लाइनमध्ये घुसली; 19 प्रवासी जखमी

Dussehra Melava 2024 Live Updates: मोहन भागवत यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथ संचलनाला सुरूवात

अग्रलेख : अपने अपने रावण!

Dussehra 2024 Wishes: 'वाईटावर चांगल्याचा आणि अधर्मावर धर्माचा विजय..' दसऱ्याच्या प्रियजनांना द्या मराठमोळ्या शुभेच्छा

SCROLL FOR NEXT