Nagpur heavy Rain farmers agriculture loss 
नागपूर

नागपूर : पावसाने शेतकऱ्यांना उठविले शिवारातून!

अशोक डाहाके

केळवद - गेल्या आठवड्याभरात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. वाऱ्यावर आलेले पीक शेतात सडायला लागल्याने शेतकरी चिंतातूर आहे. शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

मागील पंधरा दिवसापासून सुरू असलेल्या दमदार पाऊस झाला. सावनेर तालुक्यात सरासरी ७२९ मी.मी पाऊस झाला. यामुळे तलाव ओव्हरफ्लो झाले तर नदीनाल्यांना पूर आला. पुराचे पाणी शेतात शिरले. कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार ७ हजार ३१८ हेक्टर शेती पाण्याखाली आला. शेतकऱ्‍यांच्या शेतातील कपाशी ,तूर, भाजीपाला आणि संत्रा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अक्षरशः शेतातील पिके खरडून नेली. विशेषतः केळवद परिसरातील केळवदसह जैतगड, रायबासा, बिडगाव, पेंढरी, जलालखेडा, नांदागोमुख, सालई , या शिवारातील पिके पावसाच्या पाण्यामुळे वाहून गेली. शेतात मोठमोठे खड्डे पडले असून,पावसाच्या पाण्याने वाहून आलेले दगड,माती,गाळ कचऱ्याचा ढीग शेतात जमा झाला आहे.

शेतातील धुरे फुटल्याने शेतकऱ्‍यांचे नुकसान झाले आहे. मंत्र्यांचे झाडे वाहून गेली. यामुळे खरीप हंगामातील सर्व पिकांचे नुकसान झाले. शेतकऱ्‍यांनी संसाराचा गाढा हाकलायचा कसा, असा प्रश्न शेतकऱ्‍यांपुढे आहे. शासनाची तोकडी मदत शेतकऱ्‍यांच्या लाखो रुपयाच्या झालेल्या नुकसानीचे अश्रू पुसणार काय? असा सवाल ही शेतकऱ्यांनी प्रशासनाला केला आहे.

पाटबंधारे विभागावर शेतकऱ्‍यांचा रोष

रायबासा आणि बिडगाव गावाला लागून रायबासा प्रकल्प आहे. हा प्रकल्प यावर्षी शंभर टक्के भरला आहे. या प्रकल्प लगतची नाला दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे पावसाचे पाणी नाल्यामार्फत शेतात शिरले. रायबासा येथील नाल्याकाठावरील शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान झाले. विशेष म्हणजे मे आणि जून महिन्यात या भागात पाटबंधारे विभागाचे पोकलेन मशिन कामासाठी कार्यरत होती. या भागातील शेतकऱ्‍यांनी मागणी करूनही या भागातील नाले सफाई केली गेली नाही.

माजी मंत्री केदार यांचा पाहणी दौरा

सततच्या पावसामुळे रायबासा येथील शेतकऱ्‍यांचे शंभर टक्के नुकसान झाले. या भागातील नुकसानग्रस्त शेताची पाहणी माजी मंत्री सुनील केदार करणार आहेत.

सततच्या मुसळधार पावसामुळे रायबासा ,बिडगाव या गावातील ५० हेक्टर शेतातील पीक वाहून गेले. शेतात माती, गाळ ,कचरा आणि मोठमोठ्या दगडांचा थर जमा झाला आहे. शेतातील धुरे फुटलेले आहेत. यामुळे कपाशी आणि संत्रा पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. शासनाने ओला दुष्काळ जाहीर करा आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी.

- सोनू रावसाहेब, सरपंच, जटामखोरा ग्रामपंचायत

अतिवृष्टीमुळे पंढरी येथील नाल्या काठावरील ७० टक्के शेतकऱ्‍यांच्या शेतातील उभे पीक वाहून गेली. शेतात सध्याच्या स्थितीत पावसाच्या पाण्याचा पाझरा झाला. शेतातील उरलेले पीक खराब होत आहे. अशा स्थितीत राज्य सरकारने शेतकऱ्‍यांना सरसकट मदत न करता नुकसान झालेल्या शेतकऱ्‍यांना मदत करावी.

- राहुल जोगी, सरपंच ,पंढरी

दमदार पावसामुळे लघुसिंचन विभागाचा तलाव ओव्हर फ्लो झाला. गावालगतचा नाल्याला आलेल्या पुरामुळे नाल्याकाठावरील ९० शेतकऱ्‍यांच्या शेतातील उभे पीक वाहून गेले. यात प्रत्येक शेतकऱ्‍यांचे लाखांचे नुकसान झाले. शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी एक लाखांची मदत द्यावी.

- गुणवंत काळे, सरपंच ,जलालखेडा

शेतकऱ्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशात केळवद जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत येणाऱ्‍या बऱ्‍याच गावातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. रायबासा, बिडगाव,केळवद,जलालखेडा येथील शेतकऱ्‍यांच्या शेतातील पिके पावसामुळे खरडून गेली आहेत. अशा स्थितीत शेतकऱ्‍यांना भरीव मदत मिळावी यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने शासनाला प्राथमिक अहवाल सादर करून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्‍यांना हेक्टरी एक लाखांची मदत मिळावी अशी मागणी केली आहे.

-सुमित्रा मनोहर कुंभांरे, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद, नागपूर

रायबासा आणि बिडगाव येथील पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. यात पाटबंधारे विभागाला दोष देणे चुकीचे आहे. मे आणि जून महिन्यात रायबासा तलावातील पाखरन अंतर्गत तलावातील गाळ काढण्यासाठी पोकलेन मशिन आणली होती. रायबासा तलावाच्या शेजारील नाल्याची दुरुस्ती अथवा कचरा काढणे , नाल्यातील गाळ काढणे ही कामे पाटबंधारे विभागाची नाही. ती संबंधित मृद व जलसंधारण विभाग कळमेश्वर यांची आहेत.

- नरेंद्र निमजे, उपअभियंता पाटबंधारे विभाग, सावनेर,

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT