Hingna Accident  Esakal
नागपूर

Nagpur Accident: ट्रिपल सिट जाणं जिवावर बेतलं; खांबाला दुचाकीची धडक, तीन तरुणांचा मृत्यू

धुलीवंदनाच्या दिवशी खामला चौकाकडे ट्रीपल सिट जाताना मोटारसायकल विजेच्या खांबाला धडकल्याने तिन्ही मित्रांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

सकाळ डिजिटल टीम

Hingna Triple Seat Riding Accident: धुलीवंदनाच्या दिवशी खामला चौकाकडे ट्रीपल सिट जाताना मोटारसायकल विजेच्या खांबाला धडकल्याने तिन्ही मित्रांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (ता.२५) दुपारी पावणेदोन वाजताच्या सुमारास ढोमणे सभागृहासमोरील रिंग रोडवर घडली.

निकेश ज्ञानेश्‍वर अतकरे (वय २७, रा. अमरनगर, हिंगणा), उमेश रामेश्‍वर शेंडे (वय २५, रा. हिरणवार लेआउट, जयताळा)आणि प्रकाश भैयालाल राऊत( वय २५, रा. हिरणवार लेआउट, अष्टविनायकनगर, एमआयडीसी) अशी मृतांची नावे आहेत. प्रकाश हा लिफ्ट मेकॅनिक असून निकेश क्रेन ऑपरेटर तर उमेश दुकानात काम करतो.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धुलीवंदनाच्या दिवशी प्रकाश राऊत याच्या मोटारसायकलवर (एम. एच. ३१ बी.झेड ४४३३) बसून निकेश आणि उमेश हे एमआयडीसी परिसरातून खामला परिसरात येत होते. ते हातवारे करीत येत होते. प्रकाश वाहन चालवित असल्याने संतुलन बिघडल्याने मोटारसायकल दुभाजकाला घासून विजेच्या खांबावर आदळली.

तिघेही जखमी झाले. प्रकाश आणि निकेशला मेडिकल येथे नेले. डॉक्टरांनी दोघांनाही तपासून मृत घोषित केले. उमेश शेंडे यास मेडिकलमध्ये दाखल केले असता, मंगळवारी (ता.२६) त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिघांच्याही कुटुंबियांवर शोककळा पसरली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स 900 अंकांनी खाली, गुंतवणूकदारांचे 8.50 लाख कोटी रुपयांचे नुकसान

Latest Maharashtra News Updates Live : पुण्यात आचारसंहिता भंगाच्या ७१ तक्रारींची नोंद

IND vs NZ: केएल राहुलला मिळणार डच्चू अन् पुणे कसोटीत Shubman Gill करणार पुनरागमन? कोच म्हणाले...

Dr. Jayashree Thorat : वडिलांवर बोलाल तर तुमची जागा दाखवू ,संगमनेरमध्ये दडपशाही चालणार नाही

Diwali Recipe : गोड नेहमीच बनवताय, यंदा खारी शंकरपाळी ट्राय करा, फराळाची चवच बदलेल

SCROLL FOR NEXT