Nagpur Hit And Run Case 
नागपूर

Nagpur Hit And Run: 300 कोटींच्या संपत्तीसाठी सुनेनं दिली सासऱ्याच्या हत्येची सुपारी! नागपूरच्या 'हिट अँड रन' केसमध्ये धक्कादायक खुलासा

Amit Ujagare (अमित उजागरे)

नागपुरात घडलेल्या 'हिट अँड रन' प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. 300 कोटी रुपयांच्या संपत्तीच्या हव्यासापोटी सुनेनं सासऱ्याच्या हत्येची 1 कोटी रुपयांची सुपारी दिल्याचं उघड झालं आहे. नागपूरच्या गुन्हे शाखेच्या तपासातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

नागपूरच्या बालाजी नगर परिसरात २२ मे रोजी एका कारनं पुरुषोत्तम पुट्टेवार यांना चिरडून निघून गेली होती. या अपघातात पुट्टेवार यांचा जागीच मृत्यू झाला होता. वरकरणी हा अपघात वाटत असला तरी जीवे मारण्यासाठी रचलेला हा कट होता, हे पोलीस तपासात समोर आलं आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या माहितीनुसार, सासऱ्याच्या हत्येसाठी सुनेनं एका कार चालकाला १ कोटी रुपये आणि बारचं लायसन्स देण्याचं कबूल केलं होतं. यासाठी मारेकरी ड्रायव्हरला 17 लाख रुपये अॅडव्हान्स देण्यात आले होते.

दरम्यान, या हिट अँड रन प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेली सून अर्चना पुट्टेवार ही गडचिरोली जिल्ह्यात सरकारी नोकरदार आहे. या आरोपी सुनेसह आणखी तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT