नागपूर : मानस चौकातील खालस हॉटेलमधील खानसामाचा मृतदेह चादरीत गुंडाळलेल्या अवस्थेत आढळला होता. कोणताही सुगावा नसताना पोलिसांनी सुतावरून स्वर्ग गाठून हत्याकांडाचा छडा लावला. तीन साथिदारांनी खानसामाचा बत्त्याने ठेचून खून करीत तीन लाख रूपये लुटून पोबारा केला होता. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून त्याने अन्य दोघांच्या मदतीने खून केल्याची कबुली दिली. सतीश उर्फ बबलू रामराईस तिवारी असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 मे रोजी मानस चौकातील खालसा हॉटेलमध्ये हात, पाय बांधलेले रक्ताच्या थारोळ्यात ब्लॅंकेटमध्ये लपेटलेले, कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. पोलिसांची विविध पथके आरोपीच्या मागावर असतांना यातील आरोपी तिवारी हा मध्यप्रदेशमध्ये पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांच्या चौकशीअंती हॉटेलमधील हत्याकांड झालेल्या शंकर असे कर्मचाऱ्याचे नाव आहे. सतीश उर्फ बबलू रामराईस तिवारी (32, रा. ग्राम बशीगडा, ता हनुमना, जिल्हा रिवा) पोलिस स्टेशन शहापूर व इतर दोघे असे आरोपींचे नाव आहे.
आरोपी आणि शंकर खालसा हॉटेलमध्ये काम करायचे. दरम्यान अचानक लॉकडाऊन घोषित झाल्याने हॉटेलचे कामकाज बंद झाले. त्यामुळे काही दिवस आनंदात जात नाही तोच आरोपीची नजर शंकरने जमा करून ठेवलेल्या लाख रुपयांवर गेली. आणि ही रक्कम लुटून नेण्याची अन्य दोन साथीदाराच्या संगनमताने योजना आखली. दरम्यान एका रात्रीला शंकरकडील 3 लाख रुपये लुटण्याच्या प्रयत्नात झटापट झाली असता प्रतिकार करतेवेळी आरोपीनी खलबत्याच्या लोखंडी बत्याने डोक्यावर वार करून शंकरची हत्या केली आणि रोख रक्कम लुटून पसार झाले होते. याप्रकरणी फिर्यादी हॉटेल मालक जसपालसिंग गुरमितसिंग बागल (रा. गुरुनानक बिल्डिंग, कमाल चौक) यांच्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.