ice sakal
नागपूर

Nagpur : गारेगार आईसक्रीमला महागाईच्या झळा ; दुधासह कच्च्या मालाची दरवाढ

चार महिन्यात ५० कोटींची उलाढाल

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : ऋतू कोणताही असो आईसक्रीम सर्वांचा जीव की प्राण असतो. पार्टी असो किंवा छोटासा घरगुती कार्यक्रम, आईसक्रीम नसेल तर त्यात रंगत येत नाही. उन्हाळ्यात तर आईसक्रीम जणू अनेकांसाठी अमृतच.

पण वाढत्या महागाईची झळ आता कुल्फी आणि आईसक्रीमलाही बसली आहे.असून दरात १५ ते २० टक्के वाढ झाली आहे. असे असले तरी वाढते उन पाहता विक्रीत २० टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. तीन ते चार महिन्यात शहरात अंदाजे ५० कोटीची उलाढाल अपेक्षित आहे.

दूध आणि इतर गोष्टी महागल्याने आईसक्रीमच्या किमतीत वाढ झाली आहे. गारेगार आईसक्रीमला महागाईच्या झळा त्यामुळे आईसक्रीमसाठी लोकांना अधिकचा खिसा मोकळा करावा लागणार आहे. लहान फॅमिली पॅक ज्याची किंमत १८० रुपये होती ती आता २०० रुपयांवर पोहोचली आहे. उन्हाळा येताच आईसक्रीम विक्रीला वेग येतो. उन्हाच्या तीव्रतेसोबतच आईसक्रीम पार्लरमध्येही ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे. बाजारात प्रत्येक फ्लेवरच्या आईसक्रीम मोठी श्रेणी उपलब्ध आहे. ती सर्वच वयोगटातील ग्राहकांना आकर्षित करते.

आईसक्रीम पार्लर संचालकांनी सांगितले की, शहरात अरुण, अमूल, क्वालिटी, वाडीलाल, मदर डेअरी, दिनशॉ, ट्रीट, हॉक्समेक, बिस्कीन रॉबिन, टॉप ॲन टॉऊन, बस्कीरिबन्ससह या ब्रँड्ससह स्थानिक आईसक्रीमही बाजारात उपलब्ध आहेत. कप, कोन, स्टिक्स आणि फॅमिली पॅकमध्ये तसेच वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये ते उपलब्ध आहे.

१५० ते २०० प्रकरचे आईसक्रीम फ्लेवर बाजारात आहेत. सर्वसामान्यांना परवडेल अशा दरातील सर्व ब्रँड्सनी त्याचे छोटे पॅक देखील काढले आहेत. जे आकर्षक आणि वाजवी किमतीत सर्वांना उपलब्ध होतात. एका कप आईस्क्रीम २० किंवा २५ रुपयांपासून सुरू होते. त्याचप्रमाणे अँगल, स्टीक आणि फॅमिली पॅकही लहान व मोठ्या आकारात उपलब्ध आहेत.

कोरोनाच्या ब्रेकनंतर बुस्ट

दोन वर्षांपासून कोरोनाच्या टाळेबंदीनंतर आता शीतपेयांच्या दुकानांमध्ये गर्दी दिसू लागली आहे. मागील दोन वर्ष दुकाने बंद होती. यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव संपला असून सर्व निर्बंध शिथील झाले आहेत. त्यामुळे व्यावसायिकांनीही मोकळा श्‍वास घेतला आहे. बंद पडलेल्या शीतपेयांच्या चाकांना गती मिळत आहे.

केशर-पिस्ता, बटर स्कॉच ऑल टाईम फेव्हरेट

अनेक नवीन फ्लेवर्स बाजारात आले आहेत, पण केसर-पिस्ता आणि बटर स्कॉच आणि सोबतीला कुल्फी सदाबहार आहेत. त्यापाठोपाठ ब्लॅक फॉरेस्ट, चॉकलेट, स्ट्रॉबेरी, व्हॅनिला, राजभोग, रजवाडी या फ्लेवर्सलाही पसंती असते. हिवाळ्यात आईसक्रीम मागणी मंदावल्याने व्यवसाय कमी होत असला तरी मार्च ते जून आणि जुलै ते सप्टेंबर या काळात आईसक्रीमची प्रचंड विक्री होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aheri Assembly Election Results 2024 : बापाने केला लेकीचा पराभव! अहेरी मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: शरदचंद्र पवार पक्षाचे विजयी उमेदवार अभिजीत पाटील यांनी जीपवर चढून दंड थोपटत विजय साजरा केला

khadakwasla Assembly Election 2024 Result Live: खडकवासलात भाजपचा विजयाचा चौकार, भीमराव तापकीर यांनी पुन्हा मारली बाजी

Rajan Naik Nalasopara Assembly Election 2024 Result : नालासोपाऱ्याचा गड भाजपचाच; राजन नाईक यांचा दणदणीत विजय

Dapoli Assembly Election 2024 Results : दापोलीत आमदार योगेश कदमांनी राखला गड; ठाकरे गटाच्या संजय कदमांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT