Railway News esakal
नागपूर

Nagpur : नागपुरातून सुटणाऱ्या सहा एक्‍स्प्रेस रद्द

नागपुरातून सुटणाऱ्या व समाप्त होणाऱ्या एकूण सहा एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील दौंड ते मनमाड दरम्यान दुहेरीकरणाच्या कामासाठी बेलापूर, चितळी आणि पुणतांबा स्थानकादरम्यान लाईन डबलिंग प्रोजेक्टसाठी नॉन इंटरलॉकिंग करण्यात येणार आहे. त्यामुळे नागपूर मार्गे धावणाऱ्या, नागपुरातून सुटणाऱ्या व समाप्त होणाऱ्या एकूण सहा एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

गाडी क्रमांक १२११४ नागपूर-पुणे गरीबरथ एक्स्प्रेस २१ मार्चला रद्द करण्यात आली आहे. यासह २२ मार्चला १२११३ पुणे-नागपूर गरीबरथ एक्स्प्रेस आणि १२१३६ नागपूर-पुणे एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. गाडी क्रमांक ११०३९ कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस २१ व २२ मार्चला आणि ११०४० गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस २२ व २३ मार्चला रद्द करण्यात आली आहे.

१२१३५ पुणे-नागपूर एक्स्प्रेस २३ मार्चला धावणार नाही. यासह १२१३० हावडा-पुणे आझाद हिंद एक्स्प्रेसच्या २० व २१ मार्चला आणि २२ मार्चला १२१२९ पुणे-हावडा आझाद हिंद एक्स्प्रेसच्या मार्गात बदल करण्यात आला असून दोन्ही गाड्या नागपूर, बल्लारशाह, सिकंदराबाद, वाडी व दौंड मार्गे धावणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बाळासाहेबांची मोठी भूमिका, पंतप्रधानांचा थेट सदानंद सुळेंना फोन... सुप्रिया सुळेंनी सांगितला लग्नाचा 'तो' किस्सा!

Share Market Opening: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स- निफ्टी लाल रंगात

'राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार, ते कोणी माई का लालही रोखू शकणार नाही'; अजितदादांचा कोणाला इशारा?

Gold Price: ओमान, यूएई, कतार आणि सिंगापूरच्या तुलनेत भारतात सोन्याचे भाव कमी; काय आहे कारण?

Mumbai Traffic: मुंबईच्या रस्ते वाहतुकीत उद्यापासून बदल, जाणून घ्या महत्त्वाची बातमी

SCROLL FOR NEXT