Nagpur Inter-Caste Marriage: आंतरजातीय विवाह करणाऱ्या एका उच्चपदस्थ अधिकारी असलेल्या मुलीचे वडील व काका यांनीच अपहरण केल्याची केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गिट्टीखदान पोलिसांनी चंद्रपूर पोलिसांच्या मदतीने त्यांना अटक केली.
रवींद्र पोन्नम (वय ५२), वनदिश पंडित (वय ४२), संतोष पोन्नम (वय ३८ रा. तेलंगणा) असे तिन्ही आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांचन (बदललेले) नाव आणि रमेश (बदललेले नाव) यांचे एकमेकांवर प्रेम जुळले. कांचन उच्चपदस्थ अधिकारी तर रमेश हा आयटी इंजिनिअर.
मात्र, जातीच्या भिंती आडव्या आल्याने कांचनच्या घरच्यांनी लग्नास स्पष्ट नकार दिला. दोघांनीही पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि नागपुरात स्थायिक झाले. मात्र, कांचनच्या घरच्यांना ही बाब अतिशय जिव्हारी लागली. त्यामुळे त्यांनी मुलीला कसेही करून घरी परत आणण्याचे ठरविले. त्यामुळे तिच्या वडिलांनी आपल्या लहान भाऊ आणि मित्रासह शोध घेण्यास सुरुवात केली. (Latest Marathi News)
मुलगी नागपुरात राहते असे कळताच, त्यांनी शहर गाठले. तिच्या मागावर राहून मंगळवारी (ता.९) सांयकाळी पावणे सहा वाजताच्या रस्त्याने जात असताना, तिचे अपहरण केले. ही बाब पतीला दिसताच, त्याने गिट्टीखदान पोलिस ठाणे गाठून माहिती दिली. पोलिसांनी तपासाची सूत्रे हलवली. कार क्रमांक नागपूर पासून तर सर्वच जिल्ह्यांना देण्यात आला.
कार चंद्रपूरच्या दिशेने गेल्याचे कळताच, चंद्रपूर पोलिसांनी सर्वच ठाण्यातील पोलिसांना कामी लावले. अखेर बल्लारशा येथून आरोपींना ताब्यात घेत कांचनची सुटका करण्यात आली. गिट्टीखदान पोलिसांनी आपले पथक पाठवून मुलीसह तिघांनाही नागपुरात आणले. याप्रकरणी पोलिसांनी ३६५,३४ अंतर्गत गुन्हा दाखल करीत, अटक केली असून तपास सुरू आहे. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.