sports sakal
नागपूर

Nagpur : जागतिक टेबलटेनिस स्पर्धेत नागपूरच्या जेनिफरचा ‘डंका’

१५ वर्षांखालील मुलींच्या एकेरी व मिश्र दुहेरी प्रकारांमध्ये दुहेरी विजेतेपद पटकाविले.

सकाळ डिजिटल टीम

Nagpur - उपराजधानीतील आंतरराष्ट्रीय टेबलटेनिसपटू जेनिफर वर्गीसने रिओ दी जिनेरिओ (ब्राझील) येथे आयोजित जागतिक टेबलटेनिस कंटेडर स्पर्धेत १५ वर्षांखालील मुलींच्या एकेरी व मिश्र दुहेरी प्रकारांमध्ये दुहेरी विजेतेपद पटकाविले.

जेनिफरने मुलींच्या एकेरीतील अंतिम सामन्यात भारताच्या सयानिका माझीचा ११-४, ११-८, ६-११ व ११-९ ने पराभूत करून विजेतेपद मिळविले. त्याअगोदर, झालेल्या उपांत्य सामन्यात जेनिफरने भारताच्याच रियाना भुटाला १३-११, ९-११, ११-३, ११-४ ने नमवून अंतिम फेरीत प्रवेश निश्चित केला होता.

मिश्र दुहेरीतील चुरशीच्या अंतिम सामन्यात जेनिफर व प्रधिवधी भयंकरम या जोडीने यजमान ब्राझीलच्या ज्युलिया हाताकेयामा व लुकास रोमास्की या जोडीला ९-११, ११-८, १३-११, ११-१३, ११-९ ने पराभूत करीत दुहेरी विजेतेपदाला गवसणी घातली. उपांत्य लढतीत जेनिफर व प्रधिवधीने ब्राझीलच्या अबिगेल मिनेझिम व यामाने हॅमिल्टनचा ११-८, ११-५, ११-२ ने धुव्वा उडविला. जेनिफरने पेरू येथे नुकत्याच झालेल्या अन्य एका जागतिक स्पर्धेतही १५ वर्षांखालील मुलींच्या एकेरी व दुहेरीमध्ये रौप्यपदक जिंकले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election 2024: भाजपची निवडणूकपूर्व तयारी, राज्यातील सर्व २५ हेलिकॉप्टर केले बुक! महाविकास आघाडीचा प्रचार कसा होणार?

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

David Warner याची चेंडू छेडछाड प्रकरणातील मोठी शिक्षा रद्द; आता होणार कर्णधार?

Latest Maharashtra News Updates : 'परिवर्तन महाशक्ती'च्या आणखी २८ जागांची निश्चिती; स्वराज्य पक्ष, प्रहार पक्ष आजच आपल्या उमेदवारांच्या नावाची करणार घोषणा

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

SCROLL FOR NEXT